Home Breaking News *स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र* *निदान व उपचार केंद्राचे* *उद्घाटन*

*स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र* *निदान व उपचार केंद्राचे* *उद्घाटन*

207

*स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र* *निदान व उपचार केंद्राचे* *उद्घाटन*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग, मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर अशा शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून खऱ्या अर्थाने ईश्वर सेवेचे काम केले जाते, असे गौरवोद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलीत स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. श्री.सातपुते म्हणाले, विशेष मुलांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या या शाळांमधून होत आहे. याच प्रशिक्षणाच्या जोरावर ही मुले काही ठिकाणी नोकऱ्याही करत आहेत. पंखाविना भरारी आणि जिद्द काय असते ते या मुलांनी दाखवून दिले आहे.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, विशेष मुलांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टिने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे काम हे प्रेरणादायी आहे. या मुलांनी बनवलेल्या वस्तू निश्चितच गौरवास पात्र आहेत आणि अशा मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक कर्मचारी हे देखील सन्माननीय ठरत आहेत.
स्वयम उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनीही यावेळी मनोगतात या शाळेमध्ये देणारे प्रशिक्षण, होणारे उपक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी स्वयम मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष राजूभाई जोशी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष अमरदिप पाटील, श्रीनिवास मालू, खजानिस महेंद्र परमाळ, सदस्य कुलदीप कामत, मनीष देशपांडे, वकील सुलक्ष्मी पाटील, मुख्याध्यापक प्रमोद भिसे आदींसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते.

मोहन शिंदे कोल्हापूर प्रतिनिधी .

Previous articleनांदेड जिल्ह्यातील लहान तालुका अर्धापूर येथे विद्युत चाक वितरण सोहळा संपन्न.
Next article🛑 मराठा आरक्षणावरु आंदोलक आक्रमक…..! ७ नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार :- मशाल मोर्चा 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.