Home Breaking News राज्यातील १ हजार ६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक

राज्यातील १ हजार ६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक

93
0

राज्यातील १ हजार ६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई,दि.२२ – राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे.

हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन, असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

Previous articleशेतकरी_पुञाना न्याय.
Next articleधारणी अत्याचार प्रकरणी पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा’ ; चित्रा वाघ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here