Home Breaking News उद्या मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन.

उद्या मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन.

193

उद्या मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन. जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी समस्त मानव जातीला उदारता समता विश्वबंधुत्व सामाजिक न्याय आणि समानतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर वसल्लम यांचा जन्मदिन ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ऑल इंडिया तांजिम ए इन्साफ च्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन 30 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात येत आहे हमारी च्या सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यात शहर राज्यात रक्ताचा खूप मोठा तुटवडा भासत असून महाराष्ट्र शासनाने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुलूस मिरवणुकीला परवानगी न देता सामाजिक कार्य करण्याचे आवाहन समाजबांधवांना केले गेलेले आहे ऑल इंडिया तांजीम ए इन्साफ निमित्त सोहेलटी हाऊस मेन रोड येथे शुक्रवार 30 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी अकरा ते सहा वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून मानवतेचे कर्तत्व पार पाडावे असे आवाहन हाफिजअब्दुल गफार हाफिज माजी द साब शेख इस्माईल शेख रियाज चांद पाशा इम्रान पठाण यांनी केलेले आहे.

Previous article*देगलूर येथे एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू*
Next article🛑 *पुण्यात ६३९ कोरोनामुक्त; २४१ नवे रुग्ण* 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.