• Home
  • *देगलूर येथे एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू*

*देगलूर येथे एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू*

*देगलूर येथे एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू* देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- मित्राच्या लग्नाला आलेल्या देगलूर तालुक्यातील बळेगाव येथील शिवराज लक्ष्मण वाडीकर वय 18 वर्षे हा तरुण पुणे येथून दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी गावाकडे आला होता. व 26 ऑक्टोंबर रोजी आपल्या मित्राचा वलिमाचा कार्यक्रम करून दुपारी तीनच्या सुमारास पाताळ गंगेच्या चौकोनी डोहात आपल्या दोन मित्रासोबत पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहनी येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .व त्याचे दोन मित्र शोधाशोध करूनही तो सापडला नाही दिनांक 28 रोजी सकाळी आठच्या सुमारास देगलूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, बीट जमादार हनुमंत बोंबले, सामाजिक कार्यकर्ते यादवराव गोरलावार, बालाजी मंडलेवार ,अशोक चींतले सर या सर्वांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली .व मच्छिमारांना बोलावून मच्छिमारांच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला .व पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी रूग्णवाहिकाला फोन करून मृतदेहाचा पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. देगलूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

anews Banner

Leave A Comment