Home गडचिरोली वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत उसेगांव,शिवराजपुर,येथे वाघाची दहशत,…. या संदर्भात वनविभागाचे अधिकारी व उसेगांवातील गावकऱ्यांच्या...

वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत उसेगांव,शिवराजपुर,येथे वाघाची दहशत,…. या संदर्भात वनविभागाचे अधिकारी व उसेगांवातील गावकऱ्यांच्या समेत घेतला आढावा…..

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220914-WA0030.jpg

वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत उसेगांव,शिवराजपुर,येथे वाघाची दहशत,….

या संदर्भात वनविभागाचे अधिकारी व उसेगांवातील गावकऱ्यांच्या समेत घेतला आढावा…..
खा.अशोकजी नेते.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनापर भेट व आर्थिक मदत…

वडसा/गडचिरोली,,(सुरज गुंडमवार) :– मागील अनेक दिवसापासून वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत उसेगांव,शिवराजपुर,या परिसरात वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक इसमाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता,नागरिक पूर्णपणे भयभीत झालेली आहे.

उसेगांव येथील तरुण युवक स्व.प्रेमलाल तुकाराम प्रधाण वय ४० वर्ष हे दिं.०८/०९/०२२ ला शेत शिवारात काम करीत असतांना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने  अचानक हल्ला करून यात जागीच  ठार केले.

या गावातील प्रेमलाल तुकाराम प्रधान हा घरातील करता सरता व्यक्ति होता. त्यांचे आई-वडील म्हातारे व मुला बाळांचे शिक्षण सुरु आहे. अशातच वाघाने त्याचा जीव घेतल्याने गावामध्ये नागरिकांचा प्रचंड रोष वनविभागावर व्यक्त केला गेला.

त्यामुळे वनविभागाचे अधिकारी व गावातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन उसेगांव येथील हनुमान मंदिरमध्ये सभा बोलवून वनविभागाचे अधिकारी व गावकऱ्यांसोबत संवाद साधुन चर्चा करण्यात आली.

एकिकडे शेतीच्या कामासाठी जाणेसुद्धा आवश्यक असतांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. या विवेचनेत जनतेचा तोडगा काढण्यासाठी खा.अशोकजी नेते यांनी आढावा घेत वनविभागाचे अधिकारी व गावकऱ्यांसोबत चर्चा सुद्धा यावेळी करण्यात आली.

या प्रसंगी गावातील लोकांनी शाळेच्या मुला मुलींकरिता बस सेवा सुरू करा.शिक्षणापासून वंचित आहेत.या संदर्भात प्रश्न निर्माण केला असता तात्काळ खा.अशोकजी नेते यांनी दूरध्वनीवरून आगार व्यवस्थापकांन सोबत बोलून सकारात्मक विचार मांडला.

वनविभागाच्या अधिकारीऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सोलर प्लांट सुद्धा लावण्यात येईल व रस्त्यावर असलेले झुळपे, झाडे हे सुद्धा तोडण्यात येईल.तसेच गावाच्या संरक्षणासाठी किंवा काय उपाययोजना केल्या जाईल.यासाठी आम्ही सदा सर्वदा वनविभागाचे अधिकारी सेवेत आहोत. असा सकारात्मक विचार चर्चेअंती खासदार अशोकजी नेते यांना दिला.

तसेच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

यावेळी खा.अशोकजी नेते यांनी वनविभागाचे अधिकारी यांना शासन स्तरावर तातडीने कामे करुन मदत देण्याचे निर्देश देऊन सूचना केल्या

याप्रसंगी खा.अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते,
सुनीलजी पारधी जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चा,सदानंदजी कुथे संपर्क प्रमुख, नंदुजी पेटटेवार तालुका अध्यक्ष,
संपर्क प्रमुख विलास पा.भांडेकर, उपाध्यक्ष अरूणजी हरडे,कवीता बारसागडे महिला तालुकाध्यक्ष वडसा,
सरपंच सुषमा संयाम,ACF मनोज चव्हाण साहेब,वनरक्षक विजय धांडे साहेब,ओमकार मडावी,योगेश नाकतोडे माजी सरपंच,वसंत दोनाडकर महामंत्री वडसा, प्रमोद झिलपे,पंढरी नकाते,गोपाल बोरकर, दिपक प्रधान, मारोती दांडेकर,संजय बगमारे,तसेच गावातील जनता व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here