Home रत्नागिरी आंबेड बुद्रुक शाळा 2 कानरकोंड येथे हर घर तिरंगा रॅली

आंबेड बुद्रुक शाळा 2 कानरकोंड येथे हर घर तिरंगा रॅली

179

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0019.jpg

आंबेड बुद्रुक शाळा 2 कानरकोंड येथे हर घर तिरंगा रॅली                                                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक शाळा 2 कानरकोंड येथे हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना हर घर तिरंगा या अभियानातून जनजागृती व्हावी, घराघरात तिरंगा फडकवला जावा, यासाठी जि.प.आदर्श शाळा आंबेड बु. नं. २ कानरकोंड या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. यातून ध्वज संहिता, आपली जबाबदारी, फडकविण्याची पद्धत याची माहिती पथनाट्यातून गावकर्‍यांना करून दिली.विविध घोषणा देशभक्ती गीत, संवाद, पोस्टर मधून हर घर तिरंगा या अभियानांची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.नयना कानर , श्री.सुभाष कानर, राजेश कानर श्री.जनार्दन सुर्वे, श्री.दत्ताराम कानर, सौ.दिया शिगवण, दिलीप शिगवण, पालकवर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यासाठी शाळेचे मूख्याध्यापक श्री. केळकर श्री.पाचकले श्री.शिंदे, श्री.बावस्कर यांनी मेहनत घेतली.

Previous articleखंडाळा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
Next articleलांजातील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागल्याने वाहतूक थांबवली वाहतुकीचे अनेक मार्ग बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.