Home जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षकांनी केली मतमोजणी...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंगरूमची पाहणी

39
0

आशाताई बच्छाव

1000346019.jpg

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024

18-जालना लोकसभा मतदारसंघ

 

निवडणूक निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंगरूमची पाहणी

 

परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे दिले निर्देश

 

जालना,  (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)  :- जालना लोकसभा मतदारासंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी शुक्रवारी (दि.3) जालना एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुमची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध बाबींची तपासणी करून केलेल्या योग्य नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे कौतुक केले. मतदान यंत्र या स्ट्राँगरुममध्ये ठेवल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा स्ट्रॉंग रूम नोडल ऑफिसर सोहम वायाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक श्री. राजपूत हे उपस्थित होते.

श्रीमती मार्टीन यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था असल्याची पाहणी करून खात्री केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला परिसर सुरक्षित करण्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी सर्वांसोबत त्यांनी चर्चा करून सर्व नियोजन व्यवस्थित करण्याची सूचना केली. सुरक्षा व्यवस्थे संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करून पुढील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.

Previous articleलोकसभा निवडणूक : काँग्रेस पक्षातर्फे सहा निरीक्षकांची नियुक्ती
Next articleदैनिक माहाभूमीच्या प्रतिनिधींची माहोरा येथे बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here