Home बुलढाणा संग्रामपूर गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांची रंगली कार्यालयीन वेळेतच ओली पार्टी

संग्रामपूर गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांची रंगली कार्यालयीन वेळेतच ओली पार्टी

152
0

राजेंद्र पाटील राऊत

20220715_104846-BlendCollage.jpg

संग्रामपूर गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांची रंगली कार्यालयीन वेळेतच ओली पार्टी

संग्रामपूर तालुका विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपुर:- दारुडे भाऊसाहेब म्हणून नावलौकिक असलेले संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस एम पाटील यांची मुळातच वादग्रस्त काम चुकार व बेवडेबाज म्हणून ओळख आहे कारण याआधी त्यांच्या विरुद्ध जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असतांनी दिनांक 5 में 2020 रोजी त्यांच्या विरुद्ध ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई येथून निलंबनाचा आदेश झाला होता. त्यावेळी त्या आदेशात असे म्हटले होते की संजय मधुकर पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती मंठा, जिल्हा परिषद जालना यांच्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे कार्यालयामध्ये वारंवार अनुपस्थिती राहणे, बैठकीत अनुपस्थित राहणे, कार्यालयात मध्य प्राशन करणे इत्यादी बाबी आढळून आल्या होत्या गटविकास अधिकारी एस एम पाटील हे कार्यालयीन कामकाजा बाबत गंभीर नसल्याचे व प्रशासकीय कामकाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे गटविकास अधिकारी एस एम पाटील यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम तीन व नियम 28 चा भंग करून केलेल्या गैरवर्तुनीकी बाबत त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा सुद्धा आदेश झाला होता. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग येथील आदेश क्रमांक मविसे 4220/प्र. क्र.48/आस्था -2 दिनांक 5 में 2020 नुसार गटविकास अधिकारी एस एम पाटील यांचे निलंबन सुद्धा झाले होते. परंतु या महाशयावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे व वरिष्ठांपर्यंत त्यांचे धागेदोरे असल्याचे बोलले जात आहे आणि म्हणूनच सद्यस्थिती संग्रामपूर गटविकास अधिकारी म्हणून असलेले कर्तव्य शून्यअसे एस.एम.पाटील हे संग्रामपूर पंचायत समितीचे मुख्य असून सुद्धा स्वतःच्या पदाला काळीमा फासणारे अश्या अशोभनीय सवयीचे असल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ तालुक्यातील काही ग्रामसेवक यांना सुद्धा सहाजिकच मध्यप्राशनाची लत लागली असेच काहीसे म्हणावे लागेल. तसे पाहिल्यास गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट-अ मधील असतो परंतु संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची त्यांच्या वरिष्ठांवर वेगळीच छाप दिसून येते. कारण तालुक्यातील नागरिक त्यांच्या कामानिमित्त पंचायत समितीच्या चकरा मारून मारून हैराण होतांना दिसतात आणि एकीकडे मात्र जिल्हा परिषद मुख्याधिकारी बुलढाणा यांचे आशीर्वादाने संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस एम पाटील हे कार्यालयीन वेळेत केव्हाच हजर राहत नाहीत आणि योगायोग हजर असले तरी मद्यप्राशन केलेलेच असतात आणि पंचायत समितीच्या चकरा करुन हतबल झालेल्या नागरिकांनी जर कामे होत नसल्याने ग्रामपंचायत बाबत किंवा इतर कुठलीही तक्रार गटविकास अधिकारी एस एम पाटील यांच्याकडे केली तर हे मध्य प्राशन केलेले महाशय त्या नागरिकांना गुंडगिरीची भाषा वापरत किंवा माचीस ने पेटवून देण्याच्या किंवा पोलिस स्टेशन ला त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याच्या धमक्या देतात एवढेच नाही तर एखादे प्रकरण त्यांच्या अंगलट आले तर स्वतःची चामडी वाचवण्यासाठी 353 सारखे खोट्या केसेस सुद्धा त्या गोरगरीब नागरिकांवर करण्यात अग्रेसर आहेत काही दिवसांपूर्वी तालुक्यातीलच कोद्री येथील नागरिक माजी सरपंच श्रीराम पाटील खोंड यांनी ग्रामपंचायत च्या मनमानी कारभाराविरुद्ध घरकुल बाबत गरजू लाभार्थी यांना लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती समोर उपोषण करणार होते. परंतु त्यांना गटविकास अधिकारी यांनी उपोषण केल्यास माचीसने पेटवून देईल अशी धमकी दिली होती त्यावर खोंड यांनी गटविकास अधिकारी एस एम पाटील यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तामगाव येथे फिर्याद सुद्धा दिली आहे परंतु त्याचा तपास मात्र तासगाव पोलिसांकडून संत गतीने चालू आहे.आणी त्याच घटनेचे साक्षीदार नंदू उर्फ पुंडलिक खानझोड व इतर काही जण असल्याने त्यापैकी साक्षीदार यांनी गटविकास अधिकारी यांचे विरोधात साक्ष देऊ नाही म्हणून गटविकास अधिकारी यांनी त्या साक्षीदार पैकी प्रथमदर्शनी असलेले साक्षीदार नंदु उर्फ पुंडलीक खानझोड यांचे वर दबाव आणण्याच्या दृष्टीने त्यांचे विरुद्ध खोटी फिर्याद सुद्धा दिली आहे. त्यामुळे इतर साक्षीदार सुद्धा साक्ष देण्यास गेल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा गटविकास अधिकारी हे पोलिसांना हाताशी धरून खोटी फिर्याद देऊ शकतात. असे सदर घटनेतील साक्षीदार यांनी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांच्या कडे बोलतांना सांगितले त्यामुळे इतर साक्षरतारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि आता श्रीराम खोंड यांनी दिलेल्या फिर्याद वरून चौकशी चालू असून गटविकास अधिकारी यांच्याविरुद्ध खानझोड यांनी घटलेल्या घटनेची साक्ष देऊ नाही म्हणून नंदू उर्फ पुंडलिक खानझोड यांच्यावर दबाव आणण्याच्या दृष्टीने पुन्हा दिनांक 12 जुलै 2022 मंगळवार रोजी पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दिली असल्याचे नंदू खानझोड यांचे कडून माहिती मिळाली. वास्तविक पाहता त्याच दिवशी म्हणजे दिनांक 12 जुलै2022 रोजी गटविकास अधिकारी व इतर चार ग्रामपंचायत ग्रामसेवक हे वरवट बकाल येथे कार्यालयीन वेळेत एन्जॉय करण्याकरिता रूम भाड्याने केलेली आहे त्या रूमवर गटविकास अधिकारी एस एम पाटील आणि चार ग्रामसेवक हे ओली पार्टी करतानांची काही सुज्ञ नागरिकाने घेतलेले व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. पदाचा दुरुपयोग करीत मद्यप्राशन करून बेवडेशाही व सामान्य नागरिकांवर वारंवार खोट्या केसेस करणाऱ्या गटविकास अधिकारी यांचेवर व चार ग्रामसेवक यांनी कार्यालयीन वेळेत ओली पार्टी केल्या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here