Home नांदेड राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचे निकाल जाहीर  सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम

राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचे निकाल जाहीर  सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम

138
0

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0002.jpg

राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचे निकाल जाहीर

सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य आषाढी एकादशीचे औचित्य साधून आँनलाईन राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे निकाल गोखले हायस्कूल बोरीवली येथिल कलाशिक्षीका सौ.शमिका बांदेकर यांच्या हस्ते दि.१४ जुलै रोजी यूटूब लिंक द्वारे आँनलाईन निकाल घोषित करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुलांच्या सुप्ल कलागुणांना वाव मिळावा म्हणून सृजन संस्थेमार्फत वर्षभरात ७५ उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहीती महादेव खळुरे यांनी दिली.
राज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेतील दोन्ही गटाचा आँनलाईन निकाल घोषित करण्यात आला. लहान गटातून प्रथम-चैतन्य चंद्रकांत कोरे,द्वितीय-वेदांश धनंजय काष्टे,स्वरित राजेश दाभाडे,तृतीय-उत्कर्ष नाना इंगोले ,अनन्या गौरक्षनाथ कोकणे
उत्तेजनार्थ -अर्णव महेश पतंगे तर
मोठा गटातून प्रथम-संपदा रघुनाथ रंगभाळ,द्वितीय-भक्ती हरीश घुगे,तृतीय-शरयू दुर्गेश आळणे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेचे निकाल यूटूब चँनेलच्या माध्यमातून आँनलाईन घोषित करण्यात आला. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवंत विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले.
वरील स्पर्धेसाठी किरण खमितकर,मल्लपा खळुरे,पद्मा कळसकर,अविनाश धडे आदिचे सहकार्य लाभले.

Previous articleसरपंचांचा ग्रामपंचायत कार्यालयातच वाढदिवस साजरा करून गावात केले वृक्षारोपण
Next articleसंग्रामपूर गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांची रंगली कार्यालयीन वेळेतच ओली पार्टी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here