Home मुंबई ठाणेकरांचा कोरोनाला चकवा ? दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या…!

ठाणेकरांचा कोरोनाला चकवा ? दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या…!

134
0

राजेंद्र पाटील राऊत

ठाणेकरांचा कोरोनाला चकवा ? दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या…!

ठाणे (अंकुश पवार,सहसंपादक ठाणे/युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

युवा मराठा पत्रकार महासंघ आणि युवा मराठा वेब न्युज चॅनल/ठाणे पालघर आवृत्ती सर्व युवा मराठा परिवारातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,ही दिवाळी आपल्याला आपल्या परिवाराला सुख, समृध्दी, समाधान, आरोग्य, भरभराटीची जावो,आपल्या युवर युवा मराठा वाचक,हितचिंतक,महाराष्ट्राच्या सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने आपल्या सगळ्यांना बोटावर नाचवले होते. कारोनामुळे लॉकडाऊन,जिल्हा बंदी,गाव बंदी, सर्व गोष्टी आपण अनुभवल्या आहेत. अनेक लोकांनी आपले आप्तेष्ट कोरोना मध्ये गमवलेले आहेत,त्यांचा दुःखात युवा मराठा परिवार सहभागी /सोबत आहे.

गेल्या वर्षभरापासून दिवाळी,दसरा,गणपती,नवरात्र इ आपले हिंदू सण कोरोनाच्या निबंधात गेले परंतु आता ह्या वर्षी ठाणे मध्ये ठाणेकरांनी को चकवा दिला आहे का असे परिस्थिती दिसून येत आहे. युवा मराठा प्रतिनिधी यांनी दिवाळीच्या पूर्वसंधेला ठाणे बाजारपेठेचा आढावा घेतला असता, बाजारपेठेत लोकांची गर्दी पाहून कोरोनची तिसरी लाठ येणार असे वाटत नाही कारण ठाणेकरांची तुफान गर्दी पाहून दिवाळी जोरात होणार असे नक्कीच दिसत आहे.

दिवाळी जोरात झालीच पाहिजे कारण गेले वर्ष भरापासून आपण घरात आहोत, आपल्या स्नेही ,नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो.त्यामुळे ठाणे बाजार पेठेतील प्रतेक पदार्थाचे,वस्तूचे दुकाने, व्यापारी, छोटे मोठे दुकानदार सर्वच सुरळीत सुरू असल्याचे आणि जुने ठाणे चे आठवण होईल असे तेउडीच तुफान गर्दी पाहायला मिळाली.
ही गर्दी पाहून प्रतेक आर्थिक नुकसान झालेले छोट्या मोठ्या दुकानदार व्यापारी याना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. परंतु सरकारी आदेशानुसार अजूनही नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून,आपली आपल्या परिवाराची काळजी घेऊन ही दीपावली साजरी करूयात!
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ,मुंबई
युवा मराठा वेब न्युज चॅनल/साप्ताहिक पेपर.

Previous articleगडचिरोलीत जाणवले भुकंपाचे सौम्य झटके:
Next articleनांदेड सह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता – जिल्हा प्रशासन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here