Home नाशिक वनसगांव विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट…

वनसगांव विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट…

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20230406-WA0109.jpg

वनसगांव विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट…

भेटीत शालेय कामकाजाबद्दल केले कौतुक

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

वनसगाव– येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित सुधीर तांबे यांनी सदिच्छा भेट दिली .सदर भेटीत त्यांनी विद्यालयाच्या सेवकांसोबत हितगुज करताना शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या .रयत शिक्षण संस्था रयत परिवार व आपले कायमचे ऋणानुबंध असून आपले आभार व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे अशा भावना आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केल्या .याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सी.डी. रोटे यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा शाल व बुके देऊन सन्मान केला .त्यांच्यासोबत निफाड नगराध्यक्ष देवदत्त कापसे ,संदीप आबा टर्ले यांचे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.विद्यालयाच्या भौतिक सुविधा बाबतीत तसेच शासन स्तरावरील सेवकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार सत्यजित तांबे यांनी दिली .याप्रसंगी पर्यवेक्षक के.बी.दरेकर, उपशिक्षक अर्जुन चव्हाण, भिका भवर ,मनीराम महाले, नितीन पिंगळे ,अरविंद वसावे , अनिल वाघ, बाळासाहेब गांजवे, आनंदा आहिरे, प्रीती काळे, कुंदन जाधव , दिपक गायकवाड,ज्ञानेश्वर कुशारे, उमा चव्हाण, ममता वळवी, सुनील गांगोडे, संदीप वन्से, उमेश कुमावत, रत्नाकर केदारे मनिषा मेनगर, विजय पांगुळ ,योगिता जाधव ,गणेश कोलते,सुनीता शिंदे, वैशाली रायते, सोमनाथ जाधव, अश्विनी पोकळे, सोमवंशी सर ,नितीन निकम,भाऊसाहेब धामणे ,प्रशांत शिरसाट ,शांताराम पवार आदी उपस्थित होते.

Previous articleकाळाचा महिमा —  मित्र,सखा थाॅमस च्या जाण्याने मित्रपरिवार हळहळला
Next articleमाजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोई चे उदघाटन।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here