• Home
  • शिवडी – वरळी कनेक्टर संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक 

शिवडी – वरळी कनेक्टर संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक 

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201213-WA0003.jpg

शिवडी – वरळी कनेक्टर संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :शिवडी–वरळी कनेक्टरसंदर्भात राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी झालेल्या या बैठकीस आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार, मुख्य अभियंता (रस्ते) श्री. दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवडी – वरळी कनेक्टर हा मुंबईच्या दोन किनारपट्ट्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे काम सुरळीत तसेच गतीने व्हावे यासाठी या प्रकल्प मार्गावरील लोकप्रतिनिधी आणि एमएमआरडीए , महापालिका अधिकारी यांच्यामध्ये वेळोवेळी बैठक घेऊन प्रकल्पाचे काम गतिमान करण्यात येत आहे.

आजच्या आढावा बैठकीत विशेषत: प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांचे त्याच परिसरात चांगल्या रितीने कसे पुनर्वसन करता येईल याबाबत यावेळी चर्चा झाली. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल .

असे मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले….

anews Banner

Leave A Comment