• Home
  • बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन(

बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन(

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201213-WA0043.jpg

बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन( संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) कर्नाटक परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालकाचा काल दिनांक 12 रोजी देगलूर तालुक्यातील वन्नाळी टोल टोलनाक्याजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना लगेच देगलूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. औराद आगाराची ही बस औराद ते नांदेड जाण्यासाठी सकाळी 11 वाजता देगलूरच्या नवीन बस स्थानकावरून नांदेड कडे जाण्यासाठी निघाली असता, देगलूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वन्नाळी टोलनाक्याजवळ येताच बस चालक मकबूल शेख वय 48 वर्षे त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे बस लगेच रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. प्रवाशाने त्यांना देगलूर येथील रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. दुपारच्या नंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

anews Banner

Leave A Comment