Home संपादकीय लोकशाहीची हत्या;पत्रकार शशिकांत वारीसे हत्याप्रकरण

लोकशाहीची हत्या;पत्रकार शशिकांत वारीसे हत्याप्रकरण

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20230212-WA0006.jpg

संपादकीय…लोकशाहीची हत्या;पत्रकार शशिकांत वारीसे हत्याप्रकरण!!    वाचकहो,शासन,प्रशासन,आणि न्यायासन येथे जर कुणावर अन्याय झाला,तर त्याला वाचा फोडण्याचे नैतिक आणि इमाने इतबारे जर कुणी कार्य करीत असेल तर तो असतो जागृत पत्रकार! लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार आज जगतोय कसा? राहतोय कसा? त्याचे दैनंदिन जीवनमान कसे? याचेशी ना शासनाला देणे घेणे,ना प्रशासनाला खंत…मात्र एक पत्रकारच खरे खोटयाची जागृती जनतेला करतो.त्यावेळी त्याला ना सुरक्षा असते.ना कुणाचे पाठबळ…मात्र तरीही पत्रकार “तळहातावर शीर”घेऊन सातत्याने लढत असतो.जनतेच्या हितासाठी सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी! आमचा सहयोगी पत्रकार सहकारी शशिकांत वारीसे यांचा दोष तो कोणता होता? सत्याच्या मार्गावर चालून पत्रकारिता करणे हाच जर दोष असेल,तर लोकशाही अस्तित्वात राहिली कुठे? पत्रकार शशिकांत वारिसे यांचा ज्या पध्दतीने अपघात घडवून निर्घृणरित्या खून करण्यात आला.ते निंदनीय तर आहेच.पण…शासनाने बनविलेले कागदोपत्री तकलादू कागदे अजून किती वारिसेंचा बळी घेणार आहेत?आता सर्वत्र निषेध होतील,आंदोलने होतील,निवेदने दिले जातील.मात्र त्यातून वारिसे हे थोडेच परत येणार आहेत? या अग्रलेखाच्या माध्यमातून आम्हांला शासनाला एव्हढेच सांगायचे आहे की,पत्रकार कुणीही असो,त्याच्या जीवाताच्या हमी शासनाने स्विकारायला हवी.शशिकांत वारिसे या पत्रकारावरील नियोजीत कटकारस्थानाचा आम्ही “राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ”च्या वतीने तीव्र निषेध व धिक्कार करीत आहोत.*आम्ही जगतोय तळहातावर शीर घेऊन* आज पत्रकारितेचे स्वरूप बदलत चालले आहे.सोशल मिडीया,इंटरनेटव्दारे जो तो पत्रकारिता करायला शिकला व तसे वागायला लागला आहे,मात्र मुळ प्रश्न हा आहे की,हाडामासाचा पत्रकार,समाजासाठी तळमळीने झटणारा पत्रकार आज कुठे तरी दुर्लक्षित होत चालला आहे.त्याला ना पाहिजे तेवढया संरक्षण सुविधा शासनाकडून उपलब्ध नाहीत.त्यामुळेच शशिकांत वारीसे प्रकरणात अराजकीय गुंडाचा नंगानाच वारीसेंच्या हत्येला कारणीभूत ठरतो! *अजून किती वारीसेंचा बळी जाणार?* आज शशिकांत वारीसेंचा जीव घेतला,तर उद्या आमच्या सारखेही व-हाणे प्रकरणात न्यायासाठी दोन वर्षापासून लढाई लढत आहेत,पण….अनेक प्रलोभने,आमिषे,लालूच दाखवूनही जर आम्ही बधतच नाही,तर आमच्याविरुध्दही कुटील षडयंत्र रचून आम्हांला संपविण्यासाठी कारस्थान रचले जात आहे;त्यामुळेच आम्ही एक लोकशाहीचे सच्चा पाईक म्हणून व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ” या आमच्या जीवावर उठलेल्या भामटयांचा” खरा चेहरा जनतेसमोर यावा म्हणून प्रतिज्ञापत्र स्टँम्पपेपरवर करुन ठेवलेले आहे.सत्यता एव्हढीच की,सकाळी घरातून बाहेर गेल्यावर सायंकाळी घरी परत येऊ किंवा नाही?एव्हढे पत्रकाराचे जगणे अवघड झाले आहे,त्यामुळे शासनाने कठोरात कठोर पाऊले उचलून समाजात असलेल्या या किडींचा समूळ नायनाट करण्याबरोबरच पत्रकारांच्या जीवीताची हमी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.तरच खरा लोकशाहीचा चौथा स्तंभ (खांब) अस्तित्वात आहे व जीवंत याची जाणीव भुरटया भडभुंज्या भामटयांना होईल.

Previous articleजय हिंद विद्यालय कासुर्डी यांची माजी विद्यार्थ्यास आर्थिक मदत
Next articleआदर्शवादी उपसरपंच नारायण (देवा) निकम ठेंगोडयातील प्रेरणादायी उपक्रम….       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here