Home नांदेड शिवसेनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी शिवाजी कुंटूरकर यांची निवड.

शिवसेनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी शिवाजी कुंटूरकर यांची निवड.

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220730-WA0025.jpg

शिवसेनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी शिवाजी कुंटूरकर यांची निवड.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि जिल्हा समन्वयक बळवंत तेलंग यांच्या शिफारशीने व जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मामीडवार यांच्या पुढाकाराने नायगाव तालुका युवा तालुकाध्यक्षपदी शिवाजी यादव कुंटूरकर यांच्यासह तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
तळागाळातील सर्वसामान्य माणसांना शिवसेना पक्षाने मानाचे स्थान देऊन विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठविला आहे. पक्षाचे ध्येय उद्दिष्टे व जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि पक्ष मजबुतीसाठी तालुका कार्यकारणीची शिवसेनेच्या मातोश्रीवर निवड करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे,व जिल्हा समन्वयक बळवंत तेलंग यांनी पक्षश्रेष्ठीकडे शिफारस केली असल्याने नायगाव युवा तालुकाध्यक्षपदी शिवाजी कुंटूरकर तर उपाध्यक्षपदी साईनाथ वानखेडे, प्रज्योत कुलकर्णी, समन्वयक माधव देशमुख, चिटणीस बालाजी वनशेट्टे, नायगाव युवा शहराध्यक्ष शेरसिंग टाक, शहर समन्वयक निशांत पवार तर शहर चिटणीस अतुल पापडवार यांची शिवसेना मातोश्रीवर निवड करण्यात आली. सदर पक्षाच्या तालुका कार्यकारणीचे शिवसेना नांदेड जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, नायगाव तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे, जिल्हा समन्वयक ओम प्रकाश धुपेकर, गांधी साहेब व चव्हाण साहेब यासह सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here