Home नाशिक आदर्शवादी उपसरपंच नारायण (देवा) निकम ठेंगोडयातील प्रेरणादायी उपक्रम….       

आदर्शवादी उपसरपंच नारायण (देवा) निकम ठेंगोडयातील प्रेरणादायी उपक्रम….       

155
0

आशाताई बच्छाव

IMG-20230211-WA0074.jpg

आदर्शवादी उपसरपंच नारायण (देवा) निकम ठेंगोडयातील प्रेरणादायी उपक्रम….                 सटाणा,(राजेंद्र पाटील राऊत/नयन शिवदे युवा मराठा न्युज नेटवर्क)- माणूस मेल्यानंतर सोबत काहीच येत नाही,हे अंतीम सत्य असतानाही स्वस्वार्थासाठी लढणारे झगडणारे खुपच असतील.मात्र यातील एक समाजभिमूख आगळा वेगळा वाटणारा माणूसकी जोपसणारा अवलिया….नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावी असल्याचे आम्ही या बातमीपत्रातून दर्शवू इच्छितो.नारायण (देवा) माधवराव निकम हे सर्वसामान्य कुटूंबातून पुढे आलेले व्यक्तीमत्व.राजकारणाचा कुठलाही सबंध नाही.किंवा घराण्यातून यापूर्वी राजकारण नाही.तरीदेखील नारायण(देवा) निकम हे ठेंगोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच या पदावर विराजमान होताच त्यांनी लोकाभिमुख व लोकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली.काही काळ ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत असताना त्यांना मिळालेले शासनाचे उपसरपंच व सदस्यपदाचे मानधन अवघे १६,१७ हजाराचे, त्यात त्यांनी स्वतःच्या उपजीविकेतील काही पैसे टाकून गावातील जिल्हा परिषादेच्या मराठी शावळेला व एका विद्यालयाला पंखे भेट दिलीत.एकंदरीत आजच्या धावपळीच्या युगात फक्त स्वार्थ पाहणाऱ्यांसाठी हा आदर्श आहे.एक बागलाण तालुक्यातील शेतकरीपुत्र असलेला नारायण (देवा) निकम यांचा हा प्रेरणादायी उपक्रम निश्चितच प्रोत्साहन रुपी इतरांना मार्गदर्शक ठरु शकतो.

Previous articleलोकशाहीची हत्या;पत्रकार शशिकांत वारीसे हत्याप्रकरण
Next articleपालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष कौतूक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here