Home पालघर पालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष...

पालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष कौतूक.

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20230211-WA0077.jpg

पालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष कौतूक. पालघर – वैभव पाटिल युवा मराठा न्युज पालघर

दि .१० फेब्रवारी २०२३ रोजी शाळा पूर्व तयारी अभियान अंर्तगत जागतिक बँक व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शाळा पूर्व तयारी अभियान अंर्तगत पालघर जिल्हयात शाळा भेटीचा विशेष दौरा पार पडला.
या वेळी जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाने भेट देऊन शाळा पूर्व तयारी अंर्तगत परीसंवाद व प्रत्यक्ष जि.प. शाळा भोयेपाडा ता. वसई या तालूक्यातील शाळेतील मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली. या वेळी जागतिक बँक पथकातील *
किको इनोई ( प्रॅक्टिस मॅनेजर फॉर एज्युकेशन, साऊथ एशिया ,जागतिक बँक),
सारा आयपे, (इज्यूकेशन कंन्सलटंट ,जागतिक बँक )
सरोज जगताप, (सहाय्यक संचालक, MPSP मुंबई)
शुभ्रा झा, ( PMG Member , Pratham Foundation )
हे पथकातील मान्यवर उपस्थित होते.
सन २०२२ -२३ मध्ये जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे (भा.प्र.से ), उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती पंकज कोरे, शिक्षणाधिकारी प्राथ/ माध्य, संगीता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्व तयारी अभियान संपन्न झाले होते. या अंतर्गत पालघर जिल्हयात “पहीले पाऊल “च्या अनुषंगाने राबविलेल्या कार्यक्रमाची माहीती PPT सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
यावेळी जिल्हयात २५६६७ इ.१ ली मध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी ४४०२ माता गट, ५८१२ स्वयंसेवक, ५९७६ माजी विदयार्थी, ५३५१ मुख्याध्यापक व शिक्षक २१४५ अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी या बालकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत राबविलेल्या विशेष अभियानाची माहीती दिली.
तसेच विभागस्तरीय प्रशिक्षण, जिल्हास्तर प्रशिक्षण, केंद्रस्तर प्रशिक्षण व प्रत्यक्ष शाळा स्तरावरील मेळावा क्र. १ व २ ची माहीती देण्यात आली .
यानंतर प्रमुख मान्यवरांनी उपस्थित डायट, बीआरसी व सीआरसी सदस्य यांच्याशी शाळापूर्व तयारी अभियान कार्यक्रमाच्या अनुषंगाने संवाद साधला.
कार्यक्रमास उपस्थित असणारे DIETसदस्य, गटशिक्षणाधिकारी,पं.स.वसई, सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती , IED विशेष तज्ञ, विशेष शिक्षक यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
परीसंवाद सत्राच्या शेवटी
माधुरी पाटोळे ( गटशिक्षणाधिकारी. प. स वसई) यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
दूसऱ्या सत्रात या पथकाने जि.प.भोयेपाडा ता. वसई येथे शाळा पूर्व तयारी अंर्तगत मेळाव्याला भेट दिली.
शाळेतील मुलांनी सुंदर असे लेझीम पथकाद्वारे व अप्रतिम अशा पारंपारिक तारपा नृत्याने पाहूण्यांचे स्वागत केले. या नंतर पथकाने शाळापूर्व तयारी अभियान अंर्तगत मांडलेल्या सर्व स्टॉलची पहाणी केली. या वेळी इ.१ ली च्या वर्गात दाखल होणाऱ्या ११ दाखल पात्र स्थ, पालक व SMC सदस्य यांच्याशी संवाद साधला व शिक्षणात येणाऱ्या अडचणी या बाबत विचारणा केली. शाळेतील विद्यार्थी व दाखल पात्र मुलांची शाळा प्रवेशाची उत्तम तयारी पाहून आनंद व्यक्त केला.

Previous articleआदर्शवादी उपसरपंच नारायण (देवा) निकम ठेंगोडयातील प्रेरणादायी उपक्रम….       
Next articleलासलगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना; ४ जण जागीच ठार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here