Home नाशिक लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना; ४ जण जागीच ठार

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना; ४ जण जागीच ठार

136
0

आशाताई बच्छाव

IMG-20230213-WA0049.jpg

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना; ४ जण जागीच ठार

भास्कर देवरे
(युवा न्यूज नेटवर्क )
लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम चालू असताना दुर्घटना झाली आणि यात ४ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेने सहकारी कर्मचारी अत्यंत संतप्त झाले आहेत. परिणामी लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे.
लासलगाव रेल्वे स्थानकावर ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरच्या धडकेत चार गॅंगमनचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सहकारी कर्मचारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे यावेळी मनमाड -मुंबई गोदावरी एक्सप्रेस ही रोखून धरली होती. रेल्वे पोलिसांच्या विनंतीनंतर रेल रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असून या रेल रोको आंदोलनामुळे गोदावरी एक्सप्रेस २० मिनिटांनी उशिरा मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावर काम करत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना चिरडलं. या भीषण दुर्घटनेत कर्मचारी जागेवरच ठार झाले आहे. आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. कर्मचाऱ्यांना रेल्वेने चिरडले, त्यामुळे सहकारी कर्मचारी संतप्त झाले. अशात चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले. या घटनेमुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते आणि त्यांनी रेल रोको आंदोलनाला सुरुवात केली होती.
रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सहा वाजता उभी होती. ही टॉवर गाडी लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी जायचं होतं. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमन कामासाठी हजर होते. त्यांचं काम सुरू होतं. मात्र अचानकच या टॉवर गाडीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही लक्षात येण्याच्या आतच त्यांना चिरडले. यात चौघे कर्मचारी जागीच ठार झाले. त्यामुळे आंदोलन सहकारी कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.
आंदोलनामुळे बराच काळ येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. टॉवर रेल्वेगाडीच्या वाहनचालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचे देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावेळी लासलगाव पोलीस कर्मचारी हजर होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे चालकाला पोलिसांनी सुरक्षित स्थळी पोलीस कार्यालयात हलवलं होतं. मात्र कर्मचाऱ्यांमधील रोष मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. मात्र रेल्वे पोलिसांच्या विनंतीनंतर रेल रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

Previous articleपालघरच्या शाळा पूर्व तयारी अभियानाचे जागतिक बँक व महाराष्ट्र शासन पथकाकडून विशेष कौतूक.
Next articleलासलगाव रेल्वे अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here