• Home
  • घुणकी येथे शिवजंयती निमित्त रक्तदान शिबीर

घुणकी येथे शिवजंयती निमित्त रक्तदान शिबीर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210219-WA0199.jpg

घुणकी येथे शिवजंयती निमित्त रक्तदान शिबीर

घुणकी, ता.१९ : येथील राँयल मेंबर ग्रुपच्यावतीने शिवजयंती निमित्त
रक्तदान शिबीर, वृक्षारोपन व कोरोना योध्द्यांचा सत्कार असा संयुक्त समारंभ राधाकृष्ण मंदिरात
उत्साहात पार पडला. रक्तदान शिबीरात तीन महिलांसह ३५ जनांनी रक्तदान केले.
शिवजयंती निमित्ताने
मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक साधना जगन्नाथ सिद, सहाय्यक पोलीस निरीक्षक सायली सर्जेराव सरनाईक, फौजदार अक्षय मानसिंग पाटील, विक्रीकर सहाय्यक उदय दिलीप मोहिते, कृषी सहाय्यक संतोष पाटील,पत्रकार संजय पाटील, वृत्तपत्र विक्रेते दिलीप पाटील यांच्यासह गावातील ९ डॉक्टर्स, २० अंगणवाडी व मदतनीस, १२आशा सेविका, ४ सफाई कर्मचारी यांना पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथील संजीवन ब्लड बँकेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात ३५ जनांनी केले.
शिवमूर्ती पूजन मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक
साधना जगन्नाथ सिद यांच्या हस्ते झाले. अक्षय मोहिते यांनी स्वागत करून गेल्या चार वर्षांत घेतलेल्याकार्यक्रमांचा आढावा घेतला.१९ फेब्रुवारी २०१८ ला माजी विद्यार्थी मेळावा व उत्तुंग यश मिळविलेल्या वर्ग मित्रांचा सन्मान, २०१८ मध्ये केरळमधील पूरपरिस्थितीत टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून गरजूना अत्यावश्यक मदत, २०१९ मध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती व वृक्षारोपण, पूरपरिस्थितीत घुणकी गावातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, २०२० ला पारंपरिक शिवजयंती व आरोग्य शिबिर घेतले. यावेळी आर.टी.ओ. ऑफिसर साधना जगन्नाथ सिद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. करुणा पाटील यांनी आभार मानले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment