Home कोरोना ब्रेकिंग निसर्ग’ चक्रीवादळ उद्या सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार

निसर्ग’ चक्रीवादळ उद्या सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार

103
0

🛑 ‘निसर्ग’ चक्रीवादळ उद्या सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 2 जून : ⭕ निसर्ग हे चक्रीवादळ बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अलिबागमधील समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये उद्या सकाळी 7 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. अलिबागमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट असेल.

दुसरीकडे, 3 जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. रेल्वेची वाहतूक ही उद्या असणाऱ्या वाऱ्याचा वेग तसेच त्याअनुषंगाने इतर सूचनांवर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभा केलेल्या रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळाने होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसेच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे नऊ गट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्री.अभंग,निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.⭕

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
Next articleघाबरून वेडंवाकडं पाऊल टाकू नका; कोरोनाप्रमाणे या संकटाला तोंड देऊ – मुख्यमंत्री
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here