Home नांदेड तळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

तळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

92
0

राजेंद्र पाटील राऊत

तळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

राजेश एन भांगे

आज तळेगाव उमरी ता. येथे गोरठेकर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन डॉ. विक्रम देशमुख व उमरी पंचायत समिती उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम गावातील गरजु व्यक्तींना राशन वाटप करण्यात आले, त्यानंतर गावातील रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक असणार्या कोविड १९ किट मोफत वाटप करण्यात आल्या.

व सध्या कोरोनाच्या या महाभयंकर परीस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
अशा परीस्थितीत तळेगाव येथील सर्व युवक वर्ग पुढाकार घेऊन आज या रक्तदान शिबीरामध्ये भाग घेऊन रक्तदान करुन योगदान युवकांनी दिले आहे.

तसेच यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ. विक्रम देशमुख, उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, मध्यवर्ती बँक नवनिर्वाचित संचालक कैलास देशमुख गोरठेकर, तळेगाव जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी आनंदराव यल्लमगोंडे, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा या अभियानाचे मुख्य संयोजक डॉ.अमोल पाटील ढगे, उमरी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव देशमुख तळेगावकर, युवा नेते विश्वजीत देशमुख, विद्यार्थी आघाडी उमरी तालुका अध्यक्ष विलास लोहगावे,
सतिषराव देशमुख, बि. व्हि. खदगाये सर, मा. सरपंच रामराव कप्पावार, लालु यंगुलवार, गटनेते रमीज बेग, मोगल मुजम्मील पटेल, संभाजी पा. जाधव, विलास आम्रतवाड, प्रकाश मठपती, रमेश हैबत्ते, केदार आम्रतवाड, गोविंद पांचाळ, सुरेश गोटमुखले, मा. सरपंच गंगाधर शिगळे, गोविंद पांचाळ, दिगांबर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleशेतकर्‍यांच्या नशिबी, आता अवकाळी..! •••वादळी वार्‍यासह पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान•••
Next articleवडगांवात तिन दिवस जनताकर्फ्यु लागू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here