Home कोल्हापूर वडगांवात तिन दिवस जनताकर्फ्यु लागू

वडगांवात तिन दिवस जनताकर्फ्यु लागू

94
0

राजेंद्र पाटील राऊत

वडगांवात तिन दिवस जनताकर्फ्यु लागू

वडगांव : शहरातील कोरोना दुसऱ्या लाटेतील रूग्णांचा आकडा १५२ इतकी झाल्यामुळे पालिकेने तिन दिवसासाठी जनता कर्फ्यु लागू केला असल्याची माहीती लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सांगितले.
सद्या शहरातील अस्थापणा सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू आहे परंतु नागरिकांना या कोरोना संसर्गाचे गांभीर्य नाही सकाळी बाजारात होणाऱ्या गर्दीची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वडगांव शहरातील कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा भाग म्हणून वडगांव शहरात १ मे २०२१ ते ३ मे २०२१ (शनिवार, रविवार व सोमवार) असे ३ दिवस जनता कर्फ्यू पुकारलेला आहे.
या दिवसात दूध विभाग (सकाळी ६ ते ९ चालू) दवाखाना व दवाखाना शी संलग्न असलेली मेडिकल (२४ तास चालू), तसेच इतर मेडिकल्स सकाळी ८ ते १० व सायंकाळी ४ ते ६ या वेळेतच सुरू राहतील तसेच भाजीपाला ,फळे विक्री ही पूर्णपणे बंद राहणार आहे. शहरातील इतर सर्वच्या सर्व दुकाने आस्थापना पूर्ण बंद राहतील. दरम्यान तिन दिवसात शहरातील सर्व वार्डामधे सोडिअम हायड्रोक्लोराइड औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करणार असल्याचेही यावेळी सांगितले . तरी नागरिकांनी या तिन दिवसांच्या जनता कर्फ्युचे  काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले आहे.

Previous articleतळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
Next articleदेगलूर तालुक्यातील सोमुर येथे कोरोनाचा वाढता उद्रेक पहाता सोडियम क्लोराइडची निर्जंतुकीकरण फवारणी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here