Home नांदेड शेतकर्‍यांच्या नशिबी, आता अवकाळी..! •••वादळी वार्‍यासह पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान•••

शेतकर्‍यांच्या नशिबी, आता अवकाळी..! •••वादळी वार्‍यासह पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान•••

112
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकर्‍यांच्या नशिबी, आता अवकाळी..!

•••वादळी वार्‍यासह पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान•••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलुर तालुक्यातील काही भागात सतत दोन दिवस प्रचंड वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पावसाचे सरी कोसळले त्यामुळे उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी वर्ग हतबल झाला तरीही कालपर्यत महसुल आणि कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची पंचनामे व साधी पाहणी सुध्दा करण्यात आले नाही हे विशेष.
सध्या शेतात उन्हाळी भुईमुग, तीळ, सोयाबीन यासह भाजीपाला मध्ये काकडी, दोडका, टमाटे, वांगे, यासह फळबागेचेही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्गात खुपच हतबलता असून संबंधित प्रशासनाने निदान शेताच्या बांधापर्यत येवून साधी पाहणी तरी करावी अशी मागणी करत आहेत.
तालुक्यातील सांगवी (क) बोरगाव, करडखेड, चाकुर, बळेगाव, कावळगाव, केदारकुंठा, दरेगाव, ढोसणी, भोकसखेडा, करडखेडवाडी, बल्लूर, कारेगाव, मरखेल, आमदापूर वळग, यासह आदी गावातील उभ्या पिकाचे व भाजीपाला आणि फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनातून सावरत शेतकर्‍यांनी अविरत परिश्रम करत मोठ्या कष्टाने उभारलेले पिके जमिनदोस्त झाली यामुळे बळीराजा पुरता हताश झाला असून याकडे लोकप्रतिनिधी महसुल प्रशासन कृषी विभाग तात्काळ पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे..

Previous articleजिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण
Next articleतळेगांव येथे आधार गरजुंना या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here