• Home
  • *🛑 रक्षाबंधन: राशींनुसार बंधुंना बांधा ‘या’ रंगाची राखी; नाते होईल घट्ट 🛑*

*🛑 रक्षाबंधन: राशींनुसार बंधुंना बांधा ‘या’ रंगाची राखी; नाते होईल घट्ट 🛑*

🛑 रक्षाबंधन: राशींनुसार बंधुंना बांधा ‘या’ रंगाची राखी; नाते होईल घट्ट 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 3 ऑगस्ट : ⭕ श्रावण महिन्याची पौर्णिमा राखी पौर्णिमा नावानेही साजरी केली जाते. भाऊ आणि बहिणीचे नाते घट्ट करणारा हा सण. बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे आश्वासन भाऊ देतो आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण प्रार्थना करते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग येत आहेत. नारळी पौर्णिमा, दुसरा श्रावणी सोमवार, सूर्य-शनी समसप्तक योग, बुधादित्य योग, प्रीती योग, आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग, सोमवती पौर्णिमा यांसारखे योग या एकाच दिवशी आहे. रक्षाबंधनासाठी जो उत्तम काळ सांगण्यात आला आहे, त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते. मात्र, राशीनुसार भावाला विशिष्ट रंगाची राखी बांधल्यास नाते दृढ होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. या रक्षाबंधनाला कोणत्या रंगाची राखी आपल्या भावासाठी लकी ठरेल? जाणून घेऊया…

➡️ ​मेष आणि वृश्चिक

मेष व वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तुमच्या भावाची रास मेष किंवा वृश्चिक असेल, तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी. लाल रंगाची राखी भाऊरायाच्या जीवनात नवीन ऊर्जेचा संचार करण्यास मदत करेल, असे सांगितले जाते.

➡️ ​वृषभ आणि तुळ

वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुमच्या भावाची रास वृषभ किंवा तुळ असेल, तर त्याला राखाडी/सिल्वर रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भाऊरायाच्या जीवनात शुभ परिणाम आणण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.

➡️ ​मिथुन आणि कन्या

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्या भावाची रास मिथुन किंवा कन्या असेल, तर त्याला हिरव्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते.

➡️ ​धनु आणि मीन

धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरू आहे. तुमच्या भावाची रास धनु किंवा मीन असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख आणि शांतता आणण्यास ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.

➡️ ​मकर आणि कुंभ

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या भावाची रास मकर किंवा कुंभ असेल, तर त्याला गडद निळा वा निळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. यामुळे भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक दृढ होईल, असे सांगितले जाते.

➡️ ​कर्क

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तुमच्या भावाची रास कर्क असेल, तर त्याला पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधवी. यामुळे भाऊरायाच्या जीवनात आनंदाचा गुणाकार होत राहील, असे सांगितले जाते.

➡️ ​सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या भावाची रास सिंह असेल, तर त्याला केशरी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. यामुळे भाऊरायाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी ती उपयुक्त ठरेल. तसेच भावा-बहिणीमधील प्रेम वाढेल, नाते दृढ होईल, असे सांगितले जाते. ⭕

anews Banner

Leave A Comment