• Home
  • 🛑 गोल्ड बाँड योजना २०२०-२१, मार्केट रेटपेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी 🛑

🛑 गोल्ड बाँड योजना २०२०-२१, मार्केट रेटपेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी 🛑

🛑 गोल्ड बाँड योजना २०२०-२१, मार्केट रेटपेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 3 ऑगस्ट : ⭕ सोन्याच्या किमती दररोज विक्रमी स्तरावर जात आहेत. अशात जर कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी मिळाली तर ती कोण सोडेल. उद्यापासून कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी आहे.

चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सिरीज सोमवारपासून सुरू होणार आहे. सोमवारी या योजनेसाठी अर्ज दाखल करता येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाचव्या टप्प्यासाठी गोल्ड बाँडची किमत प्रती ग्रॅमसाठी ५ हजार ३३४ रुपये इतकी निश्चित केली आहे. या बाँड ऑनलाइन अर्ज आणि पैसे जमा करणाऱ्यांसाठी प्रती ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे प्रती ग्रॅमचा दर ५ हजार २८४ रुपये इतकी असेल.

गोल्ड बाँड योजना २०२०-२१ च्या मालिकेतील पाचव्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ ऑगस्ट आहे. या योजनेचा पाचवा टप्पा अशा वेळी येत आहे जेव्हा सोन्याच्या किमतीत ३७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमती ५४ हजारच्या आसपास पोहोचल्या आहेत.

➡️ गोल्ड बाँड योजनेबद्दल…

1) भारत सरकारच्या वतीने RBI सॉवरेन गोल्ड बाँड जारी करत असते.

2) योजनेतील पाचव्या टप्प्यातील गोल्ड बाँड इश्यू करण्याची तारीख ११ ऑगस्ट २०२० आहे.

3) आरबीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात याची घोषणा केली होती. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत पाच सिरीज आणणार आहे.

4) या गोल्ड बाँडचा कालावधी ८ वर्षाचा असणार आहे. पाच वर्षानंतर तुम्ही यातून बाहेर पडू शकता.

5) याची विक्री बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिडेट, स्टॉक एक्सचेंजमधून अथवा एजंटच्या माध्यमातून विकत घेऊ शकता.

6) कोणतीही व्यक्ती कमीत कमी एक ग्रॅमचा गोल्ड बाँड विकत घेऊ शकतो. एका व्यक्तीला किंवाह अविभाजित हिंदू कुटुंबाला एका वर्षात जास्तीजास्त चार किलोग्रॅम तर गोल्ड बाँड खरेदी करू शकतात.

7) जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणार असाल तर गोल्ड बाँड हा एक उत्तम पर्याय आहे. कारण यामुळे सोन्याच्या सुरक्षिततेची काळजी राहत नाही. सोन विकत घेतल्यास त्याच्या सुरक्षेची काळजी असते. त्याला लॉकरमध्ये ठेवावे लागते आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतात. पण गोल्ड बाँडसाठी अशा कोणत्याही गोष्टीची गरज नसते.

8) गोल्ड बाँडवर प्रत्येक वर्षी २.५० टक्के इतके व्याज मिळते. तसेच मॅच्युरीटी वेळी तुम्हाला फायदा झाला तर त्यावर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही.⭕

anews Banner

Leave A Comment