Home Breaking News *🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑*

*🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑*

121
0

🛑 पुण्यातील ‘अष्टविनायक’ गणेशोत्सव मंडळाकडून कोविड केअर सेंटरची सुरुवात. 🛑
✍️पुणे:( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕आपल्या पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सदैव सामाजिक भावना आणि भान ठेवून सामाजिक योगदानात सहभागी होतात. कोरोनाच्या संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळानी आपल्या परीने सर्वतोपरी मदत केली आहे. आज गणेश मंडळाच्या वतीनं कोविड केअर सेंटर उभारून समाजापुढे नवा आदर्शच घालून दिला.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुण्यनगरीचे अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळांनी पालिकेला मदतीचा हात पुढे कर महापालिकेसमवेत संयुक्तरित्या फर्ग्युसन महाविद्यालय येथील वसतिगृहात ३०० रुग्णांकरीता ‘कोव्हिड केअर सेंटर’ सुरू केले आहे. यात ग्रामदैवत श्री. कसबा गणपती, ग्रामदेवता श्री. तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री. गुरुजी तालीम गणपती, श्री. तुळशीबाग गणपती, केसरी गणपती, श्री. भाऊसाहेब रंगारी गणपती, श्री. अखिल मंडई गणपती आणि श्री. दगडूशेठ हलवाई गणपती या गणेशोत्सव मंडळांचा यात सहभाग आहे. या सर्व मंडळांचे समस्त पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद !

महापालिकेसमवेत समन्वय साधण्यासाठी एक कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले असून खालीलप्रमाणे अष्टविनायक असणार्‍या गणपती मंडळे जबाबदारी पार पाडणार आहेत.

– कोविड केअर सेंटरच्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये सहकार्य करणे.

– कोव्हीड केअर सेंटरमधील सर्व व्यक्तींसाठी दैनंदिन भोजन, न्याहारी, चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी याची सुविधा पुरविण्यात येईल.

– मंडळांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे आयुष-मंत्रालयांनी व ICMR ने प्रमाणित केलेले आयुर्वेदिक औषधे, काढे आणि रूग्णांसाठी गरम पाणी यांची सुविधा पुरविण्यात येईल.

– कोव्हीड केअर सेंटरसाठी PPE kit पुरविणे.

– मंडळांनी सेंटरसाठी १ MBBS व ३ बी.ए.एम.एस. डॉक्टर्स यांचे पॅनेल नियुक्त करावे व त्यांचेमार्फत केंद्रात दाखल रूग्णांना आयुर्वेदिक काढे व औषधे आपल्या जबाबदारीवर देण्यात यावे.

– मंडळांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड पुरविण्यात यावे.

– सेंटरमध्ये २४ तास सुरक्षारक्षक व्यवस्था पुरविण्यात यावी.

– सेंटरमधील रूग्ण क्षमता वाढीसाठी आवश्यक ते अतिरिक्त १०० बेडस पुरविण्यात यावे.

– केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार स्वयंसेवक नेमण्याची जबाबदारी मंडळांची राहील.

– सेंटरसाठी एक रूग्णवाहीका पुरविण्यात येईल….⭕

Previous article🛑 गोल्ड बाँड योजना २०२०-२१, मार्केट रेटपेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी 🛑
Next article*कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक -*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here