• Home
  • इंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट आणि कोवॅक्सिन दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित

इंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट आणि कोवॅक्सिन दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210103-WA0123.jpg

इंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट
आणि कोवॅक्सिन दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित

भारतामध्ये गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी झुंज देत असलेल्यांना आज थोडा दिलासा मिळाला आहे.
आज तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) भारतातील आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची वॅक्सिन कोविशिल्ट आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल व्ही.जी. सोमानी यांनी म्हटले की, सुरक्षेबाबत काही शंका असती तर आम्ही ती कधीही मंजूर केली नसती. लस ११०% सुरक्षित आहेत. सौम्य ताप, वेदना आणि अ‍ॅलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसमध्ये सामान्य आहेत. लोक या लसीद्वारे नपुंसक होऊ शकतात, हे पूर्णपणे बकवास आहे.डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमानी म्हणाले की, दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीतही याचा वापर करता येतो. डीसीजीआयच्या म्हणण्यानुसार दोन्ही लसींचे दोन डोस इंजेक्शन म्हणून दिले जातील.
माहितीनुसार, या दोन्ही लसी २ ते ८ अंश तापमानात संरक्षित केल्या जाऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्या भारतात सहा कोरोना लसांच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्यात कोवशील्ड आणि कोव्हॅक्सिन देखील आहेत. कोविशिल्ट हे ऑस्ट्रॉक्सी लस आहे, जी अ‍ॅस्ट्रॅझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे यांनी विकसित केली आहे. कोवॅक्सिन ही भारतीय औषधी संशोधन परिषदेच्या सहकार्याने बायोटेक ऑफ इंडियाने विकसित केलेली एक देशी लस आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment