Home सामाजिक समाजामध्ये बालविवाह एक मोठा प्रश्न?

समाजामध्ये बालविवाह एक मोठा प्रश्न?

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0054.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे युवा मराठा न्यूज: समाजामध्ये बालविवाह एक मोठा प्रश्न? गेल्या महिनाभरामध्ये महिला आयोगाने केलेल्या कारवाईमध्ये ७ बालविवाह थांबवलेले आहेत. समाजामध्ये बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी महिला आयोगाने खूप मोठे कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये ७ बालविवाह महिन्याभरात थांबवले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक बालविवाहाची नोंद मुंबई या ठिकाणी झाली.महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बाल विवाह होत आहेत ही एक खूप मोठी चिंतेची बाब आहे. त्यानंतर शिक्षणाचे माहेरघर पुणे या ठिकाणी देखील बालविवाह खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. पुणे यांचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोकण हे आहे. अशाप्रकारे बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. महिला आयोगाने केलेल्या कारवाईचे समाजातून मोठ्या स्तरावर कौतुक होत आहे. हे बालविवाह लवकरच थांबतील असं महिला आयोगाने स्पष्ट सांगितले आहे.ईथून पुढच्या काळामध्ये या बालविवाहामध्ये नक्कीच कठोर कारवाई होईल याची नोंद घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे. एकंदरीतच काय तर बालविवाह हा समाजामध्ये खूप मोठे संकट आहे असे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here