Home जळगाव सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलच्या आगीत पाच कोटींचे नुकसान 50 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण...

सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलच्या आगीत पाच कोटींचे नुकसान 50 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण : इम्पोर्टेड रद्दी पेटल्याने आग

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0052.jpg

सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलच्या आगीत पाच कोटींचे नुकसान 50 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण : इम्पोर्टेड रद्दी पेटल्याने आग

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

भुसावळ : पेपर बनवण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावा जवळील सुदर्शन पेपर मिलमध्ये रविवारी सकाळी 10
वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. रद्दी विभागात लागलेल्या आगीचे लोण तयार पेपर झालेल्या भागातही पोहोचल्याने सुमारे सातशे टन तयार माल जळून खाक झाला तर सुमारे बाराशे किलो इम्र्पोटेड रद्दी जळून खाक झाली. या आगीत सुमारे पाच कोटींवर रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पेपर मिलचे मालक राजीव नारायण चौधरी यांनी ‘युवा मराठा वृत्तपत्राच्या प्रतिनिधी’ शी बोलताना दिली. आग विझवण्यासाठी जिल्हास्तरावरील पालिकांमधून बंबांना पाचारण करण्यात आले तर सुमारे 50 बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळाले तर काही भागात
रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट कायम होते.
इम्पोर्टेड रद्दी पेटल्याने आग
सुदर्शन पेपर मिलमध्ये ‘डुप्लेक्स’ नावाचा महागडा पेपर तयार होतो. हा पेपर बनवण्यासाठी विदेशातील कच्चा माल (प्रेसिंग रद्दी) मागवण्यात येते. सुमारे बाराशे टन रद्दी पेपरच्या मिलच्या आवारात आणून पडली होती मात्र वाढते ऊनाच्या तीव्रतेने प्रेसिंग रद्दीच्या एका गठाणीला रविवारी सकाळी 10 वाजता आग लागली व पाहता-पाहता पेपराने लागलीच पेट घेतल्यानंत संपूर्ण मिलमध्ये आणीचा वणवा पसरला. रविवार असल्याने पेपर बंद असल्याने कामही बंद होते शिवाय तुरळक
कर्मचारी आल्याने त्यांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्याचा जोर अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यास अनेक अडचणी आल्या. भुसावळसह जळगाव, दीपनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
पोलिसांनी केली आगीची पाहणी
आगीची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील, तालुका पोलीस स्टेशनचे गणेश गव्हाळे, जगदीश भोई, विशाल विचवे, चालक राजू काझी, वीज वितरण कंपनीचे धांडे, सुनसगाव वीज वितरण कंपनीचे अभियंता देवयानी शेटे व वीज कर्मचारी, तलाठी जयश्री पाटील आदींनी धाव घेतली. आगीवर सात तासांच्या प्रयत्नांनी नियंत्रण आले
असलेतरी आतून आग धुमसतच होती.
पाच कोटींचे नुकसान
सुदर्शन पेपर मिलचे मालक राजीव नारायण चौधरी
यांच्या माहितीनुसार, आगीमुळे सुमारे पाच कोटींहून
अधिक नुकसान झाले आहे. त्यात 1200 टन रॉ
मटेरीयल (रद्दी) जळाली तसेच 650 टन तयार माल (डुप्लेक्स पेपर), शंभर टन कोळसा, 35 टन पावडर तसेच चार हजार स्वेअर फूटचे शेड नष्ट झाले. आगीनंतर भुसावळ तालुका पोलिसांनी पाहणी केली असून सोमवारी नुकसानीबाबत तालुका पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Previous articleआमदार एकनाथ खडसेंमुळेच जावयाला जेलवारी : भुसावळात मंत्री गिरीश महाजन.
Next articleसमाजामध्ये बालविवाह एक मोठा प्रश्न?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here