• Home
  • शैक्षणिक फी संदर्भात क्रांतिकारी निर्णय, सौ.विद्या पोळ

शैक्षणिक फी संदर्भात क्रांतिकारी निर्णय, सौ.विद्या पोळ

शैक्षणिक फी संदर्भात क्रांतिकारी निर्णय,
सौ.विद्या पोळ

कोल्हापूर :पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील डाँ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलने सन २०२०-२०२१ पासुन २०२३-२४ पर्यंत शैक्षणिक फी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा क्रांतिकारी निर्णय १२फेब्रूवारी पालक-शिक्षक सभेवेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात सर्वच पालक शैक्षणिक शुल्क भरू शकले नाहीत. सर्वच पालकांना आर्थिक स्थितीला तोंड द्यावे लागले. या स्थितीचा विचार करता शैक्षणिक फी संदर्भात क्रांतिकारी निर्णय घेणे योग्य वाटले. शिक्षणापासून वंचित राहिलेले विद्यार्थी या निर्णयामुळे नक्कीच प्रवाहात येतील. शैक्षणिक फी संदर्भातील सकारात्मक बदल म्हणजे पुनावाला स्कूलने विद्यार्थी वर्गासाठी केलेला छोटासा प्रयत्न म्हणावा लागेल.
सौ.विद्या पोळ
अध्यक्षा, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगांव.

anews Banner

Leave A Comment