Home कोल्हापूर डाँ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक शुल्कामध्ये चार वर्षे वाढ नाही

डाँ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक शुल्कामध्ये चार वर्षे वाढ नाही

160
0

डाँ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक शुल्कामध्ये चार वर्षे वाढ नाही,

पालक – शिक्षक संघाचा क्रांतिकारी निर्णय

कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात सर्वांचीच आर्थिक स्थिती कोलमडली त्यामुळे सर्वानाच आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. काहींचे व्यापार बंद, उद्योगधंद्यांना मंदी, पगारातील कपात ह्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम आर्थिक स्थितीवर झाला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रालाही याची झळ पोहोचली त्यामुळे अगदी सर्वांनाच आर्थिक फटका सोसावा लागला. कोलमडलेल्या आर्थिक स्थितीला जाणून घेऊन व विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांना दिलासा देण्याच्या व उभारी मिळण्याच्या अनुषंगाने डॉ. सायरस पूनावाला स्कूलने 2020-21 पासून शैक्षणिक वर्ष 2023 -24 पर्यंत शैक्षणिक फी मध्ये कोणत्याही प्रकारची शुल्क वाढ न करण्याचा क्रांतिकारी निर्णय दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या पालक-शिक्षक सभेच्या वेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या पालक – शिक्षक सभेत शैक्षणिक फी च्या संदर्भात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून शैक्षणिक वर्ष 2023-24 पर्यंत कोणतीही शैक्षणिक शुल्क वाढ होणार नाही याची उदघोषणा स्कूल च्या अध्यक्षा सौ.विद्या पोळ यांनी केली. याहूनही पुढे म्हणजे पूर्व प्राथमिक व वसतीगृह शुल्कामध्ये ही कपात करून पालकांना सुखद धक्का दिला आहे. पालकांसाठीही अगदी सोन्याहून पिवळे म्हणजे विद्यार्थी वाहतूक सुविधाही मोफत करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक विभागासाठी अल्पोपहार मोफत करण्यात आलेला आहे. तसेच इतर शुल्कामध्ये सकारात्मक बदल करून पालक वर्गांला ‘पूनावाला’ स्कूलने मोठा दिलासा दिला आहे.
‘पूनावाला’ स्कूल सातत्याने विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचा विचार करत आले आहे. त्यामध्ये शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमामध्ये पालक वर्गाना समाविष्ट करून अभिनव उपक्रमाची प्रचिती करून देत असते. विविध उपक्रम, योजना, निर्णय ह्यामध्ये पालकांचे योगदान ही वाखाणण्यासारखे आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा स्वीकार करत पालकांनी स्कूलला प्रत्येक बाबीमध्ये सहकार्य करत आहेत. पालकांची आर्थिक स्थिती जाणून घेऊन वर्तमान आणि भविष्य याचा विचार करून शैक्षणिक फी मध्ये कोणतीही वाढ न करण्याचा हा निर्णय ‘क्रांतीकारी ‘निर्णय म्हणावा लागेल. शैक्षणिक फी वाढ़ न करण्याच्या निर्णयामुळे पालक वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक – पालक सभेच्या प्रसंगी संस्था सचिवा व स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांचा सत्कार शिक्षक पालक संघच्या अध्यक्षा सौ.श्रद्धा पारेख, वसतीगृह पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. राकेश माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
शिक्षक – पालक सभेच्या प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री.गुलाबराव पोळ, संस्थेच्या सचिवा व स्कूलच्या अध्यक्षा सौ.विद्या पोळ, स्कूलचे संचालक डॉ.सरदार जाधव, प्राचार्य श्री.मारुती कामत, स्कूलच्या समुपदेशिका डॉ.माधवी सावंत, शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षा सौ.श्रद्धा पारेख, वसतीगृह पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.राकेश माळी यांच्यासह, विभाग प्रमुख, शिक्षक -पालक संघाचे अन्य सदस्य यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते. ‘पूनावाला’ स्कूलच्या ह्या क्रांतिकारी निर्णयामुळे पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

डॉ. सरदार जाधव. संचालक, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगाव.

मोहन शिंदे, ब्युरोचिफ कोल्हापूर युवा मराठा न्युज.

Previous articleउन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत !देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली
Next articleशैक्षणिक फी संदर्भात क्रांतिकारी निर्णय, सौ.विद्या पोळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here