Home Breaking News उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत !देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली

उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत !देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली

187
0

उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत !देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली
प्रतिनिधी=किरण अहिरराव

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : लाल कांद्याची घटलेली आवक व देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याच्या दराला लाली चढली आहे. उन्हाळ कांद्याचे आगमन झाले असून, चार हजार ४०० रुपये असे आकर्षक दराने स्वागत झाले आहे. बिहार व पश्‍चिम बंगालमध्ये अद्याप उन्हाळ कांदा बाजारात आलेला नाही. त्यामुळे पिंपळगावच्या बाजारात कांदा चार हजार प्रतिक्विंटलच्या पुढे भाव खात आहे.

उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत
लाल कांद्याचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडील कांदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीतील आवक रोडावली आहे. दोन दिवसांपासून उन्हाळ कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी येऊ लागला आहे.

सोमवारी (ता. २३) २५ जीप, ट्रॅक्टरमधून ५०० क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला. किमान दोन हजार ५००, कमाल चार हजार ४०० रुपये, सरासरी तीन हजार ७५१ रुपयांनी उन्हाळ कांद्याचे दर व्यापाऱ्यांनी पुकारले. उन्हाळ कांद्याच्या हंगामाचा श्रीगणेशा आकर्षक दराने झाला असताना लाल कांद्याच्या आवकेत घट झाली आहे. ३५० वाहनांतून पाच हजार क्विंटल कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आला. लाल कांद्याला किमान दोन हजार, कमाल चार हजार ४५५, तर सरासरी तीन हजार ९५१ रुपये दर मिळाला.

पहिल्याच दिवशी ४,४०० रुपयांचा दर
पिंपळगाव बाजार समितीत उच्चांकी दराबरोबरच चोख वजन व रोख पेमेंटमुळे जिल्हाभरात कांदा विक्रीला येत असल्याचे पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले.

पंधरा दिवसांत दर वाढतील…
पटणा, कोलकता येथे रेल्वे रॅक सुरू झाल्या आहेत. एक्स्पोर्टला मागणी नसली तरी देशांतर्गत मागणी वधारली आहे. गुजरातमध्ये चार लाख गोणी (५० किलो प्रतिगोणी) अशी बंपर आवक असली तरी रोज ६० हजार गोण्यांचा लिलाव होत आहे. त्यामुळे पिंपळगावच्या कादा दरात उसळी आली आहे. मागणी वाढल्यास पंधरा दिवसांत कांद्याचे दर प्रतिक्विंटल पाच हजारांच्या जादुई दराला स्पर्श होईल, असा अंदाज कांदा व्यापारी अतुल शाह, सुरेश पारख, दिलीप मुथा यांनी व्यक्त केला.

Previous articleनांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील
Next articleडाँ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक शुल्कामध्ये चार वर्षे वाढ नाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here