• Home
  • महाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना

महाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210103-WA0075.jpg

महाराष्ट्र राज्य महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेत जादा कर्मचारी व अधिकारी वर्गाने सहभागी होण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती संमतीपत्र भरावयाची तारीख कर्मचाऱयांच्या मागणीनुसार आता आणखीन महिनाभराने वाढविण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडून ८ डिसेंबर २०२० रोजी स्वेच्छानिवृत्ती योजनेचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. सर्व विभागांना ते पाठविण्यात आले होते. स्वेच्छानिवृत्तीकरिता संमतीपत्र कामगाराकडून भरून घेणे व ते मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्याची मुदत यापूर्वी २ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविली होती.
आता ताज्या आदेशानुसार स्वेच्छानिवृत्ती संमतीपत्र कर्मचाऱयांकडून २२ जानेवारी २०२१ पर्यंत स्वीकारून स्वेच्छानिवृत्ती योजनेचे माहिती विवरण पत्र ‘अ’ आणि ‘ब’ मधील तपशील भरून २८ जानेवारी २०२१ पर्यंत ई-मेलवर तसेच टपालाद्वारे पाठविण्यात यावे असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांची संख्या सुमारे एक लाख आहे. यापैकी ५० वर्षे आणि त्यापुढील कर्मचाऱयांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सादर करण्यात आली आहे. ५० वर्षे आणि त्यापुढील कर्मचाऱयांसाठी साधारण २७ हजार इतकी आहे. एसटी महामंडळाला वेतनावर दर महिन्याला १०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. या योजनेमुळे एसटी महामंडळाचे वार्षिक १२०० कोटी रुपये वाचणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱयास उर्वरित प्रत्येक वर्षासाठी ३ महिन्यांचे वेतन (मूळ वेतन अधिक महागाई भत्ता) देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाला या योजनेसाठी सुमारे १४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

युवा मराठा न्यूज.

anews Banner

Leave A Comment