Home अकोला मान्सुनपूर्व तयारी आढावा समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

मान्सुनपूर्व तयारी आढावा समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

70
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0037.jpg

मान्सुनपूर्व तयारी आढावा

समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : पावसाळ्यातील अतिवृष्टी, वादळ, विजा कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तसेच आपत्ती दरम्यान व आपत्तीनंतर मदत व बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय, संपर्क राखावा व सतर्क राहून काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आज मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस उपअधीक्षक(गृह) शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तुंगारतुषार वारे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसनाशी संबंधित सर्व यंत्रणा उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील मान्सुन व त्याअनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यात माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत 693.7 मि.मी इतके पर्जन्यमान अपेक्षित असते. जिल्ह्यात्लगु, मध्यम व मोठे असे मिळून 38 प्रकल्प आहेत. तथापि, अतिवृष्टी, नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होऊन मुख्य नद्यांमध्ये प्रवाह येणे, धरणे पूर्ण भरल्याने विसर्गामुळे पुर येणे यासारख्या कारणांमुळे पूरस्थिती निर्माण होत असते. अशा स्थितींच्या वेळी सर्व यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा देणे, पूर बाधित गावांमध्ये मदत बचाव कार्याची सज्जता ठेवणे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे इ. उपाययोजना कराव्या,असे सांगण्यात आले. अशावेळी वीज पुरवठा खंडीत होत असतो, तो शक्य तितक्या लवकर पुर्ववत करण्यासाठी नियोजन करावे. वादळामुळे झाडे कोसळतात, त्यांना हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे याबाबत निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात एकूण 77 गावे पूरबाधीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सर्व स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावा. तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षावरुन घडलेल्या आपत्तीची वा स्थितीची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात यावी. तसेच गावनिहाय तालुकास्तरावरुन आपत्तीत मदत करणाऱ्या व्यक्ति, संस्था यांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, जेणे करुन नियोजन शक्य होईल,असेही यावेळी सांगण्यात आले

Previous articleपाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर
Next articleवन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न टॅंकरद्वारे 60 कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here