Home बुलढाणा गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले

गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0030.jpg

गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले

तालुका विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपूर – गौण खनिज करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वाहन पकडून कारवाई करून वाहन जप्त करण्यात आले ही कारवाई दिनांक 15 जुलै2022 रोजी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केली आहे. संग्रामपूर तालुक्यातील लहान मोठ्या नदी नाल्या मधून बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व अवैध रेती वाहतुक सुरू असून आज संग्रामपूर येथे सकाळी 10 वाजता तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना माहिती मिळताच त्यांनी वाहतूक करणारे दोन्ही ट्रॅक्टर पकडले असता त्यामध्ये रेतीमिसरीत रोळी आढळून आली आणि ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता परवाना नसल्याचे व अवैध रेतीरोळी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले,हे वाहन संग्रामपूर शहरातील असून ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम एच28बी3262 व एम एच 28एजे 6674 ह्या दोन्ही वाहनाचा पंचनामा करून ते जप्त करून वाहन तामगाव पो.स्टे.ला लावण्यात आले .तसेच ह्या कारवाई बद्दल तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ह्या कारवाई दरम्यान नगर पंचायत संग्रामपूर मुख्याधिकारी यांनी सदर दोन्ही ट्रॅक्टर नगर पंचायत च्या कामासाठी गौण खनिज वाहतूक करत असल्याची माहिती दिली. आणि मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिले असून या गौण खनिजाचे स्वामित्व मूल्य 30 हजार धनादेशा द्वारे त्यांनी जमा केला . हे सदर प्रकरण पुढील कार्यवाही साठी जळगांव जा.उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्याकडे पाठविण्यात आले अशी माहिती तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या कडुन मिळाली.
सदर पकडलेले गौणखनिज वाहतुक करणारी दोन्ही ट्रॕक्टर पोलीस स्टेशन तामगाव ला जमा करण्यात आले. नंतर राॕयल्टी पोटी 30 हजार रु.रकमेचा धनादेश न.पं. ने भरला.वास्तविक वाहतूक करण्यापूर्वी संबंधित महसूल अधिकारी यांच्या आदेशाने व पूर्व परवानगीने वाहतूक सुरू करावयास पाहिजे होती आणि त्यांनी दिलेल्या आदेशात वेळेचे बंधन तसेच नियम व अटीचा सुद्धा उल्लेख असतो वास्तविक पाहता महसूल विभागाकडून मिळालेल्या आदेशानुसारच संबंधित धनादेश भरावयास पाहिजे नंतर वाहतूक चालू करण्यात येते परंतु वरील प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे दिसून येते .त्यामुळे सदर ट्रॕक्करवर काय कारवाई होते..?आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी कोणती कारवाई करणार ? अशी चर्चा तालुकाभर सुरु आहे.

Previous articleपिंगळवाडे येथील वन विभागात वृक्षारोपणास सुरुवात
Next articleभटके समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिधापत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here