• Home
  • *के.बी.एच. विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*के.बी.एच. विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*के.बी.एच. विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा*
मालेगांव,(श्रीमती आशा बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-

के.बी.एच.विद्यालय मालेगाव कॅम्प येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून प्राचार्य तात्यासाहेब अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य सुनील बागुल होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार, संतोष सावंत, निवृत्ती निकम, ज्येष्ठ शिक्षिका पुष्पा वाघ, राजेंद्र बच्छाव , ग्रंथपाल रवींद्र नरवडे , राजेश धनवट उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक आर.बी. बच्छाव यांनी डॉ. ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचा जीवनपट विशद करून वाचनाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य सुनील बागुल यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगून कलाम यांना विनम्र अभिवादन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले .आभार राजेश धनवट यांनी मानले.जेष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा वाघ यांनी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयास ग्रंथ भेट दिले.प्रसिध्दी विभागाचे हेमंत पगार व अर्जुन खेडकर यांचे सहकार्य लाभले.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रवीण बरू( प्रथम- ७ क), समर्थ पवार (द्वितीय ५ क) ,गिरीश जाधव (तृतीय ७ ई ),प्रसन्ना आहिरे व अगस्त्य हिरे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.
सकाळ सत्रात प्रथम क्रमांक पटकावणारा विद्यार्थी निनाद खैरनार (८ एल), कुणाल कदम (द्वितीय ९ के ),वेदांत नेरकर (तृतीय ८ के ),पराग शेलार शुभम मिस्तरी यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.परीक्षक म्हणून व्यंकट मगर, राजेंद्र शेवाळे, श्रीमती मनिषा आहेर ,श्रीमती रोहिणी ठोके यांनी कामकाज बघितले. कोरोना पार्श्वभूमीमुळे शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .यावेळी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले.

anews Banner

Leave A Comment