Home वाशिम २०१७-१८ पासूनच्या लाभार्थी वृध्द कलावंताना न्याय द्या – संजय कडोळे विदर्भ लोककलावंत...

२०१७-१८ पासूनच्या लाभार्थी वृध्द कलावंताना न्याय द्या – संजय कडोळे विदर्भ लोककलावंत संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_052644.jpg

२०१७-१८ पासूनच्या लाभार्थी वृध्द कलावंताना न्याय द्या – संजय कडोळे
विदर्भ लोककलावंत संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- सामाजीक न्याय विभागांतर्गत सुरु असलेल्या वृध्द कलावंतांच्या सादरीकरणात गेल्या २०१७-१८ पासून प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थी वृध्द कलावंतांच्या प्रलंबित प्रस्तावाची दखल घेवून त्यांना मानधनासाठी पात्र ठरविण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात बुधवार, ६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, विदर्भ कलावंत संघटना व लोककलावंताच्या मागणीवरून शासनाने जिल्हाधिकारी यांना कलावंताचे मानधनाचे गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अधिकारी वर्गाच्या दोन समित्या स्थापन करून कलावंताना मुळ कागदपत्रे घेऊन ४ ते १० मार्चपर्यंत सामाजिक न्याय भवन नालंदा नगर येथे सादरीकरणाला बोलाविले आहे. मात्र यामध्ये महत्वाचे म्हणजे सध्या चालू वर्षाचे २०२२ ते २४ पर्यंतच्या नविन कलावंतानाच मुळ फाईल घेऊन सादरीकरणाकरीता बोलविण्यात आलेले असून त्यापूर्वीच्या सन २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१ मध्ये मानधनाकरीता प्रस्ताव सादर केलेल्या गरजू व खर्‍याखुर्‍या हाडाच्या कलावंताना बोलविले नसल्यामुळे जुन्या कलावंतामधून कमालीचा आक्रोश व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वतः जातीने लक्ष देऊन अगोदर जुन्या खर्‍याखुर्‍या कलावंताच्या प्रस्तावाकडे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे मत विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले असून तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर केले आहे . यावेळी संघटनेच्या पदाधिकारी कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे, कैलास हांडे, लोमेश चौधरी इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here