Home राजकीय कौळाणे ग्रामपंचायत निवडणूक…! पुन्हा चोरांच्या हाती किल्ल्या देणार का ?

कौळाणे ग्रामपंचायत निवडणूक…! पुन्हा चोरांच्या हाती किल्ल्या देणार का ?

100
0

राजेंद्र पाटील राऊत

कौळाणे ग्रामपंचायत निवडणूक…!
पुन्हा चोरांच्या हाती किल्ल्या देणार का ?
संपादकीय नांगरणी..!
वाचकहो,
ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगूल वाजला आहे.आता गावागावात उतावळे उडघ्याला बांधूनच बसले आहेत.तसेच मालेगांव जवळच्या कौळाणेतही निवडणूकीची रणधुमाळी चांगलीच रंगणार असल्याचे दृश्य सध्या तरी बघावयास मिळत आहे.निवडणुका येतात आणि जातात मात्र जनतेच्या विकासासाठी पाच वर्षात नेमकी ठोस कामगिरी काय केली याचा हिशोब चुकते करण्याची मतदारराजाला आलेली हि सुवर्णसंधीच असते.
कौळाणे (नि.) सारख्या जगदविख्यात राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जन्मगावातील ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालविला गेला तर सब घोडे बारा टक्के या न्यायाने सगळ्यांनीच संधीसाधू मतलबी धोरण अंगिकारल्याने या गावांची पुरती वाट लागली आहे.टक्केवारीच्या खेळात ज्या त्या सदस्यांनी मतलबी व स्वार्थी धोरण स्विकारल्याने विकासाच्या नावाखाली तीन तेरा नऊ बारा वाजल्याचेच कौळाणेत बघावयास मिळत आहे.लाखो रुपये खर्च करुन टेहरे शिवारातल्या गिरणा नदीजवळच्या विहिरीतून कौळाणेसाठी केलेली पाईपलाईन सपशेल फोल ठरली आहे.आणि आजही कौळाणेतील नागरिक विकतचे पाणी पित आहेत.एवढा मोठा झोल ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी टक्केवारी कमविणौयासाठी गावाशीच विश्वासघात केला.त्याशिवाय खंडेराव बरडे शेजारील नदीवरील पुल मोरीच्या नावाखाली मोठाच भ्रष्टाचार झाला आणि खंडेराव बरडे वस्तीवरील नागरिकांना ऐन पावसाळ्यात अनंत संकटाना सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.आणि गावात भुमिगत गटारीच्या नावाखाली अगोदरच्याच झालेल्या गटारी कोरुन त्यात पाईप टाकून मात्र खोटे बिले सादर करुन अमाप पैसा लाटण्यात आला.गावाशेजारील झरी नदीचे बेकायदेशीर खोलीकरण करुन त्यातील गौन खनिज संपती एका मर्जीतल्या व्यक्तीला खुष करण्यासाठी दिली गेली.आणि झरी नदीचे खोलीकरण केल्यामुळे त्या खोलगट खड्ड्यात आजाराला निमंत्रण देईल अशा घाणेरडया पाण्याचा साठा साचल्याने आणि तेच पाणी गावकीच्या विहिरीत प्रक्युँलेशन होऊन झिरपत असल्याने कौळाणे वासियांच्या आरोग्यांशी खेळण्याचा विश्वासघातकी डाव ग्रामपंचायतच्या सदस्यांना खेळला.तरीही नागरिकांना त्याचे काहीच वाटू नये म्हणजे आपण जीवंत असून मेल्यातच जमा आहोत की काय?असाही प्रश्न यानिमिताने उभा राहत आहे,ज्यांनी ग्रामपंचायतीला आपल्याच बापजाद्याची मालमता समजून लुट लुट लुटले आता पुन्हा तेच निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत.समजदार व हुशार मतदार या बांडगुळाचा टक्केवारीचा हिशोब यावेळेस निश्चितपणे विचारल्याशिवाय राहणार नाहीत.याच भडभुंज्यानी गावात अतिक्रमण वाढवताना स्वतः चे मतलब बघितले.आणि विधायक कार्यासाठी दिलेली पत्रकार भवनची जागा नामंजूर करताना सरडयासारखे रंग बदललेत.पण हे करताना कायद्याचे पुरेसे आकलन नसलेल्या ग्रामपंचायतीच्या टक्केवारी खोर सदस्यांना या वेळी मात्र कौळाणेवासिय मतदार धडा शिकवितील हि अपेक्षा.या भ्रष्टाचारी कारकिर्दचा कुणी माहिती अधिकारातून जर आवाज उठविण्याचा प्रयत्न केलाच असेल तर त्याचाही आवाज चिरीमिरी देऊन व आर्थिक तडजोडीने या भ्रष्टाचारी भामटयांनी दाबलेला आहे हा इतिहास कौळाणेवासिय अजूनही विसरलेले नाहीत. राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

Previous articleघरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीची महिलांसाठी कार्यशाळा
Next articleतलाठी संघटनेच्या मुखेड ता. अध्यक्षपदी डी.जी. रातोळीकर यांची निवड ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here