Home पुणे घरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीची महिलांसाठी कार्यशाळा

घरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीची महिलांसाठी कार्यशाळा

112
0

राजेंद्र पाटील राऊत

घरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीची महिलांसाठी कार्यशाळा/पुणे/सिध्दांत चौधरी युवा मराठा न्युज नेटवर्क

जुन्नर येथील श्री शिव छत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या घरातील परस बागेत घरगुती कचऱ्या पासून खत निर्मिती कशी करावी याची कार्यशाळा घेण्यात आली.
‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत जुन्नर नगरपालिकेने आयोजीत केलेल्या या कार्यशाळेत 50 महिलांनी सहभाग घेतला. या प्रसंगी सौ. विजया चंद्रकांत मंडलिक यांनी प्रात्यक्षिकाद्वारे झाडांचा पाला- पाचोळा, घरातील पालेभाज्यांचा कचरा, फळांच्या साली, माती, व शेणखत इत्यादींचा वापर करून आपण सेंद्रिय खत कसे तयार करावे हे महिलांना सांगितले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक म्हणाले हवेचे व पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी महिलांनी घरगुती ओल्या कचऱ्या पासून खतनिर्मिती करावी. आजच्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थान बरोबर समाजातिल प्रत्येक घटकाची आहे. मानवाचे व प्राण्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जुन्नर नगरपालिका विविध उपक्रमांमार्फत माहिती देत आहे.
स्वच्छता अभियानात जुन्नर शहराने प्रथम क्रमांक मिळवला असून याही उपक्रमात अग्रगनी राहण्यासाठी मुख्याधिकारी श्री. मच्छिंद्र घोलप व नगराध्यक्ष श्री. श्याम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याचे प्रशिक्षण महिलांना देत आहेत.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक सौ. दिप्ती कुलकर्णी यांनी केले.आवटे चित्रा यांनी ‘माझी वसुंधरा’- हरित ची शपथ महिलांना दिली. शहर अभियंता सौ.शिल्पा निंबाळकर, आरोग्य अधिकारी श्री.प्रशांत खत्री, नोडल अधिकारी राहुल गोरे, स्वप्नील जावळे व प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. संगणक अधिकारी संदीप इंगोले यांनी सूत्र संचालन केले.

Previous articleबिलोली हत्याकांड प्रकरणी मुखेड तहसील कार्यालयावर मोर्चा..
Next articleकौळाणे ग्रामपंचायत निवडणूक…! पुन्हा चोरांच्या हाती किल्ल्या देणार का ?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here