*मालेगांवचा जवान गलवान घाटीत शहीद कर्तव्य बजावताना वीरमरण*
मालेगांव -[युवा मराठा न्युज]- सध्या सुरु असलेल्या चीन व भारताच्या सीमारेषेवरील युध्दसदृश्य परिस्थितीत कर्तव्यावर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या साकुरी गावाजवळील मोरेवाडीच्या सचिन विक्रम मोरे या जवानास आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले असून,ते देशसेवेसाठी शहिद झाल्याने पुन्हा एकदा चायनाच्या छुप्या कुरापतीचा तीव्र निषेध केला जात आहे.
