• Home
  • पतंजलीने उत्तराखंड आयुर्वेद विभागाला फसवून ‘कोरोनिल’ बाजारात आणलं 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पतंजलीने उत्तराखंड आयुर्वेद विभागाला फसवून ‘कोरोनिल’ बाजारात आणलं 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पतंजलीने उत्तराखंड आयुर्वेद विभागाला फसवून ‘कोरोनिल’ बाजारात आणलं 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 25 जून : ⭕ कोरोनावर औषध तयार केला असा दावा करणाऱ्या पतंजलीच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. पतंजलीने काल ‘कोरोनिल’ हे औषध बाजारात आणलं. त्यानंतर आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातींवर बंदी आणली. दरम्यान, राजस्थान सरकारने बाबा रामदेव यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवणार असं म्हटलं आहे. या सगळ्यात आता उत्तराखंड सरकार पतंजलीला नोटीस पाठवण्याचीही तयारी करत आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभाग औषध बाजारात आणण्याची परवानगी कोणी दिली? अस सवाल पतंजलीला करणार आहे.

उत्तराखंड आयुर्वेद विभागाचे परवाना अधिकारी म्हणतात की आम्ही पतंजलीच्या अर्जावर परवाना जारी केला. या अर्जात कोरोना विषाणूचा कुठेही उल्लेख नव्हता. आम्ही रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, खोकला आणि तापावर औषधं बनवण्याचा परवाना घेत आहोत, असं अर्जात म्हटलं होतं. पतंजलीला विभागाकडून नोटीस पाठवली आहे. याआधी राजस्थान सरकारने बाबा रामदेव यांच्या कोरोनिल औषध या कोरोना औषधाच्या दाव्याला फसवणूक असल्याचं म्हटलं आहे. राजस्थान सरकारचे आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणतात की महामारीच्या काळात बाबा रामदेव यांनी कोरोना औषधे अशा प्रकारे विकण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट नाही.

आरोग्यमंत्री रघु शर्मा म्हणाले की, आयुष मंत्रालयाच्या राजपत्र अधिसूचनेनुसार बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोनाच्या आयुर्वेद औषधाच्या चाचणीसाठी परवानगी घ्यायला हवी होती, परंतु परवानगीशिवाय आणि कोणत्याही निकषाविना चाचणीचा दावा केला गेला, जे चुकीचे आहे. तथापि, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी कोणत्याही मंत्रालयाची परवानगी न घेता असं माध्यमांमध्ये आषधाची घोषणा करायला नको होती. आम्ही त्यांच्याकडे जाब विचारला आहे आणि संपूर्ण प्रकरण टास्क फोर्सकडे पाठवलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment