Home उतर महाराष्ट्र कजवाडे येथे रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कजवाडे येथे रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

82
0

आशाताई बच्छाव

IMG_20231119_063846.jpg

म्हसदी ,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे )-                  कजवाडे-येथे 2011-12 ची दहावीची बॅच पुन्हा एकत्र आली. 2011 व 12 या वर्षी कजवाडे येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेत असलेले दहावीची बॅच दिनांक 16 11 2023 गुरुवार रोजी गेट टू गेदर कार्यक्रमाचे आयोजन करून पुन्हा एकत्र आले.त्यात सर्वांनी आपल्या दहावीनंतरच्या जीवनावर ज्या घडामोडी घडल्या त्या व जे सुख दुःख आले ते मनमोकळ्यापणाने एकमेकांत व्यक्त केले व मागचे दिवसांच्या आठवणीना पुन्हा एकदा उजाळा दिला.
दहावीच्या बॅच चे क्लास टीचर कै. कासार सर यांची काल पुण्यतिथी असल्यामुळे सर्व मित्रांनी व मैत्रिणींनी सरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.या वेळी श्रीहरी बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.व केतन कदम, शुभम जाधव, ज्ञानेश्वर बच्छाव, योगेश शिरसाठ, रुपेश बोरसे, दिगंबर बच्छाव, समाधान शिंदे, तुकाराम गोयकर, नरेंद्र पवार, पूजा मोहिते, चंद्रमा माहिते, अरुणा सोनवणे, कीर्ती सोनवणे, अर्चना सूर्यवंशी, शितल भामरे, इत्यादी सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी योगेश शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानले

Previous articleम्हसदीत गणू महाराज यांचा सत्कार संपन्न
Next articleरेल्वे लाईनच्या कामावरून साडे चार लाखांच्या लोखंडी प्लेटा व आसरींची परस्पर विक्री
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here