Home नांदेड शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवव्याख्यानाचे आयोजन.

शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवव्याख्यानाचे आयोजन.

281

राजेंद्र पाटील राऊत

शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवव्याख्यानाचे आयोजन.

नांदेड /मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा उंद्री प.दे. समितीच्या वतीने उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती रंजनाताई श्रीकांत हासुरे  यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव पाटील वडजे (से. स.सो.चेअरमन ) तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते शिवश्री बजरंग पाटील जिगळे पाळेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.
शिवमती रंजनाताई हासुरे व शिवश्री बजरंग पाटील यांनी अतिशय साध्या व सोप्या भाषेत शिवकाळात राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, धार्मिक व्यवस्था,कशी होती अन् आताची परिस्थिती काय आहे अंधश्रद्धा दैवी शक्ती यावर विश्वास न ठेवता प्रयत्नवादी आणि ध्येयवादी व्हा असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी या कार्यक्रमाला गावातील व पंचक्रोशीतील हजारो शिवप्रेमी माता-भगिनी युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.