Home कोल्हापूर …शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याला अपवाद का…? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर का...

…शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याला अपवाद का…? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर का नाही…?

112
0

राजेंद्र पाटील राऊत

…शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याला अपवाद का…? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर का नाही…?

मुंबई (अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

देशाभिमान कृती समिती ची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर करन्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा शासन दरबारी मागणी केली आहे.
आश्रय आशा फाउंडेशन प्रणित देशाभिमान कृती समिती, मुंबई ही महाराष्ट्रातील एकमेव चळवळ आहे जी महाराष्ट्रातील समाज सुधारक/क्रांतिकारक/हुतात्मे/संविधान/राष्ट्र ध्वज/ इ साठी कार्य करणारी संस्था आहे. जी ज्या ज्या गोष्टी समाजात वाईट प्रवृत्ती, देशाचा अपमान करत असतील त्या गोष्टीला अगदी नेटाने सक्षम पणे तीव्र आंदोलन,विरोध निदर्शने करीत असते. त्याच पार्शवभूमीवर शिवाजी महाराजांच्या एकिरी उल्लेख वारंवार या विद्यापीठाचे नाव घेताना होत असतो जो पूर्ण देशाचा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वर्षानुवर्ष होत आहे.
आश्रय आशा फाउंडेशन प्रणित देशाभिमान कृती समिती, मुंबई हा उपक्रम राबवित आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे आदराने विकास कामे, संस्था, शासकीय योजना,रस्ते,रेल्वे स्टेशन,विभाग, विद्यापीठे,यांना देत आहे.
दुसरीकडे सन १९९२ पासून स्थापना झालेली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने शैक्षणिक संस्था चालवते मात्र एकेरी नावामुळे महाराजांचा अपमान होत आहे. यामुळे देशाभिमान कृती समिती, मुंबई ने मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री, राज्यपाल भगतसिंग कोषारी, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव तसेच खुद्द शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कुलपती, कुलगुरू यांना निवेदन दिले आहे.
आपल्या विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर करावे तसेच संकेत स्थळावर नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर करावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

Previous article” करियर कट्टा ” उपक्रमात नांदेड जिल्हा समन्वयक पदी प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांची निवड
Next articleशिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवव्याख्यानाचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here