Home नांदेड ” करियर कट्टा ” उपक्रमात नांदेड जिल्हा समन्वयक पदी प्रा.डॉ. संतोष शेंबाळे...

” करियर कट्टा ” उपक्रमात नांदेड जिल्हा समन्वयक पदी प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांची निवड

36
0

राजेंद्र पाटील राऊत

” करियर कट्टा ” उपक्रमात नांदेड जिल्हा समन्वयक पदी प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांची निवड

नांदेड,/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागात कार्यरत प्रा.डॉ. संतोष संग्राम शेंबाळे यांची महाराष्ट्र शासन आणि माहिती तंत्रज्ञान या विभागाच्या ” करियर कट्टा ” या उपक्रमात नांदेड जिल्हा ग्रामीण समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे . त्यानिमित्ताने महाविद्यालयाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने , प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. डी.के.आहेर , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी हे उपस्थित होते . महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. अडकिने यांनी प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांचा सत्कार केला . डॉ. शेंबाळे यांची निवड ही महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे , औरंगाबादचे विभागीय समन्वयक डॉ. श्रीकांत देशमुख , डॉ. राजेंद्र उढाण यांच्या निवड समितीने डॉ. सचिन खेडकर यांच्याकडून अधिकृत निवडीची घोषणा करण्यात आली .या कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रा.एस.बी.बळवंते तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किर्तिरत्न हातोडे यांनी केले .
करियर कट्टा हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक तयारी करून घेते . हा विभाग महाविद्यालयात चालू करून उद्घाटन प्रसंगी राजमुद्रा अकँडमीचे संचालक प्रा. मनोहर भोळे यांचे मार्गदर्शन लाभले . महाविद्यालयीन समन्वयक पदी प्रा.डॉ. शिवसर्जन टाले व प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांची निवड करून या विभागामार्फत यशस्वीपणे कार्य केले जात आहे . ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील आहे . या विभागाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संस्था , महाविद्यालय व आई – वडील , गुरुजनांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी कठोर मेहनत घ्यावे . ग्रामीण भागातील मुले जर उच्च पदावर अधिकारी व उद्योजक तयार झाल्यास त्यांच्या हातून सामाजिक , प्रशासकीय क्षेत्रातील उत्तम कामगिरी बजावत असतात . याकरिताच आम्ही IAS आपल्या दारी हा उपक्रम राबविले होते . महाविद्यालयाकडून यशस्वीरीत्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दखल घेत प्रा.डॉ. संतोष शेंबाळे यांची निवड ही सर्वांसाठी अभिमानास्पद आहे असे विचार अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अडकिने यांनी व्यक्त केले . यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी , वरिष्ठ , कनिष्ठ व व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले .

Previous articleगटविकास अधिकारी मुखेड यांनी दिव्यांगाच्या शिष्टमंडळा सोबत खालील प्रश्नाची चर्चा करुन संबधितास दिले आदेश
Next article…शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याला अपवाद का…? छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर का नाही…?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here