Home नांदेड गटविकास अधिकारी मुखेड यांनी दिव्यांगाच्या शिष्टमंडळा सोबत खालील प्रश्नाची चर्चा करुन संबधितास...

गटविकास अधिकारी मुखेड यांनी दिव्यांगाच्या शिष्टमंडळा सोबत खालील प्रश्नाची चर्चा करुन संबधितास दिले आदेश

167
0

राजेंद्र पाटील राऊत

गटविकास अधिकारी मुखेड यांनी दिव्यांगाच्या शिष्टमंडळा सोबत
खालील प्रश्नाची चर्चा करुन संबधितास दिले आदेश

जर 9 मार्च 22 पर्यंत मांगण्याचे लेखि ऊतर न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 13 मार्च 22 पासुन बोम मारो धरणे आंदोलन करनार
चंपतराव डाकोरे पाटिल यांचा निवेदनाद्वारे दिला इशारा
____________________________
मुखेड प्रतिनिधी संग्राम पाटील तांदळीकर

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली मा गटविकास अधिकारी साहेब तहसिलदार साहेब मुखेब यांना शिष्टमंडळ सोबत दोन्ही अधिकारी साहेब प्रत्येक विषयावर सभागृहात चर्चा करून निवेदण स्विकारले व संबधित अधिकारी यांना सर्वासमोर समज दिली.
मा गटविकास अधिकारी साहेबांनी वेळ काढून शिष्टमंडळ यांच्या सोबत संबधीत खातेप्रमुख यांच्या सोबत सात खालील प्रश्नाची सोडवणूक केली व संबधित ग्रामसेवक याना फोनवर सुचना आदेश दिले व शिप्टमंडळातील प्रत्येक दिव्यागाचे प्रश्न समजून घेऊन संबधित खातेप्रमुख यांना आदेश दिले.

खालील प्रश्न

1) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी आपल्या सहित किती ग्रामपंचायत ने ग्रामसभा बैठकीत दिव्यांग बांधवाना माहिती दिली

2) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून आजही साहित्य आपल्या कार्यालयात पडुन आहे.

3) दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांगाना विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्या करीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती 8जुलै 20
ला करून एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक १४जुलै ते ३१ जुलै २० नाव नोंदणी व दि .१ आँगस्ट ते १०आँगस्ट २० पर्यंत छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आदेश दिले असता अठरा महिन्यात आपल्या तालुक्यात किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी,मंजुरी,किती दिव्यांगाना लाभ दिला वरीष्ठाचे वेळापञक व आदेश न माननार्या अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली

4) दिव्याग राखीव पाच टक्के निधी ग्रामपंचायत, व पंचायत समिती, येथे २०१६ ते 2021 पर्यंत आज पर्यंत आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायत व आपल्या कार्यालयातून किती वेळेस दिव्यांग निधी देण्यात आला
5) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या तालुक्यातील किती गावात दिव्यांगाना काम किंव्हा बेरोजगार बता देण्यात आला

6) दिव्यांगाला स्वयंरोजगारा साठी जागा* 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाना जागा दिली
7) दिव्यांग बाधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून आपल्या तालुक्यात किती गावात घरकुल
दिव्यांगाना दिलात.
सर्व सात प्रश्नांचे लेखि ऊतर देण्यात येईल असे आश्वासन दिले
या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, ता अध्यक्ष आर एम कांबळे, रंजीत पाटिल,शेख मगदुम हनमंत हेळगीरे मानसिंग वडजे दुर्गाजी दाबनवाड श्याम जाधव बाबु पवार बालाजी दाबनवाड, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here