Home नांदेड सासरहून माहेरला जात असलेल्या नववधूसह दोन भावांचा भीषण अपघातात मृत्यू सोमठाणा जवळ...

सासरहून माहेरला जात असलेल्या नववधूसह दोन भावांचा भीषण अपघातात मृत्यू सोमठाणा जवळ झालेल्या ट्रक-मॅक्झिमो च्या धडकेत ५ जण ठार,तर नवरदेवासह ८ जण गंभीर जखमी

197
0

राजेंद्र पाटील राऊत

सासरहून माहेरला जात असलेल्या नववधूसह दोन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

सोमठाणा जवळ झालेल्या ट्रक-मॅक्झिमो च्या धडकेत ५ जण ठार,तर नवरदेवासह ८ जण गंभीर जखमी

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

भोकर : सुखी संसाराचे स्वप्न ओटीत बांधून सासरहून माहेरी परतणीसाठी पती व भावांसह माहेरी साखरा ता.उमरखेड येथे जात असलेल्या नववधू वराच्या चारचाकी वाहनास भोकर तालुक्यातील सोमठाणा जवळ दि.२१ फेब्रुवारी रोजी भरधाव ट्रकने उडविले.या भीषण अपघातात नववधू,तिचे दोन भाऊ व अन्य तिघे असे पाचजण ठार,तर नवरदेवासह पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

साखरा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथील पुजा ज्ञानेश्वर पामलवार(२१) हिचा जारीकोट ता.धर्माबाद जि.नांदेड येथील नागेश साहेबराव कन्नेवाड यांच्याशी दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी साखरा येथे मोठ्या आनंदोत्सवात विवाह झाला.तीन दिवसापूर्वी आयुष्यभराची साथ देण्याचे वचन देवून लग्नमंडपात सात फेऱ्या घेऊन ही नववधू सासरी जारीकोट येथे गेली होती.परंतु,सुखी संसाराचे स्वप्न ओटीत बांधून मांडव परतणीसाठी माहेरला पती व दोन भाऊ व अन्य नातेवाईकांसह मॅक्झिमो चारचाकी वाहन क्र.एम.एच.२९ ए.आर.३२१९ ने दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी जात असतांना या नववधू वरांसाठी हा दिवस काळा ठरला. सायंकाळी ५:४५ वाजताच्या दरम्यान भोकर-किनवट रस्त्यावरील सोमठाणा ता.भोकर शिवारातील हरीभाऊ चटलावार यांच्या धाब्याजवळ हिमायतनगरकडून भोकरकडे भरधाव वेगात येणाऱ्या विटवाहू ट्रक क्र.एम.एच.०४ ए.एल. ९९५५ ने त्या मॅक्झिमोला उडविले.हा अपघात एवढा भीषण होता की,मॅक्झिमो या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला व यातून जात असलेल्या नववधू पुजा ज्ञानेश्वर पामलवार,तिचा भाऊ दत्ता ज्ञानेश्वर पामलवार(२२),चुलत भाऊ पपडू परमेश्वर पामलवार,माधव पुरबाजी सोपेवाड(३०)रा.जांबगाव ता.उमरी व मॅक्झिमोचा चालक सुनिल दिंगाबर धोटे(२८)रा.चालगणी ता.उमरखेड यांचा जागीच मृत्यू झाला.सासरच्यांनी आनंदाने या नववधूची ओटी भरुन माहेरी पाठविले.परंतु तिचे हळदीचे अंग रक्ताने माखले व आपल्या बहिणीस माहेरी नेत असलेल्या दोन भावांचा ही यात दुर्दैवी मृत्यू झाला.सुखी संसाराचे स्वप्न भंगले व डाव अर्ध्यावर मोडला.तर नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवार(२८) रा.जारीकोट, अविनाश संतोष वंकलवाड रा.तामसा ता.हदगाव,ट्रक चालक गजानन केंद्रे,मजूर अभिनंदन मधुकर कसबे(१६)रा.वाजेगाव ता.जि.नांदेड,सुनिता अविनाश तोपलवार(३५)रा.तामसा व अन्य ३ जण गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर,भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील,सहा.पो.नि.रसूल तांबोळी, पो.उप.नि. अनिल कांबळे,पो.उप.नि.दिगंबर पाटील,जमादार संजय पांढरे, जमादार देवकांबळे,जमादार नामदेव जाधव,पोलीस नायक कळणे,काणगुले,वाळवे,उपोड यांसह आदीजण घटनास्थळी गेले.तसेच सोमठाणा येथील स्थानिक नागरीक दिलीप देशमुख सोमठाणकर,राजू बोईनवाड,पांडुरंग गोरठकर,संदीप बोईनवाड, अजय हाके व एका जेसीबीचे सहाय्य घेऊन मयत आणि जखमींना त्या वाहनातून बाहेर काढले.मदतीसाठी भोकर येथील जुनेद पटेल,बालाजी काळे,बबलू देशमुख असे अनेक तरुण धावून गेल्या व या सर्वांच्या मदतीने पोलीसांनी मयत व जखमींना तात्काळ भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.सर्व जखमींवर वैधकीय अधिकारी डॉ.सारीका जावळीकर,वैधकीय अधिकारी डॉ.शसागर रेड्डी,डॉ.साईनाथ वाघमारे,डॉ.विजयकुमार दंडे,डॉ.थोरवड,वैधकीय कर्मचारी मनोज पांचाळ,पांडुरंग तम्मलवाड,अधिपरिचारीका बोरडेवार,भाहादे,डवरे,माडोळे, तोटवाड यांसह आदींनी प्रथमोपचार केले व पुढील अधिक उपचारासाठी त्यांची नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रवानगी केली.पुढील पोलीस कारवाई पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

…माहेर व सासर या दोन्हीकडे ही शोकसागर…

साखरा ता.उमरखेड येथील सामान्य शेतकरी कुटूंबातील ज्ञानेश्वर पामलवार यांच्या पुजा ह्या मुलीचा विवाह जारीकोट येथील नागेश कन्नेवाड सोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शेतीत काबाड कष्ट करणाऱ्या पुजाचे आई,वडील व भावांनी तिला सासरी पाठविले.या नववधूने जोडीदारासह नव्या संसाराचे स्वप्न रंगविले होते.परंतु ते पूर्ण होण्याआधीच या अपघातात ते भंगले. झाले.नवरदेवाचे आई-वडील व दोन भाऊ हे देखील शेतीच करतात.अल्प शेतीत कष्ट करून हे दोन्ही कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात.या दोन्ही कुटूंबांवर अपघातातून काळाने दुर्दैवी घाला घातला व पामलवार कुटूबीयांत मुलीच्या आणि कन्नेवाड कुटूंबीयांत मुलाच्या लग्नाचा आनंद तीन दिवसही राहिला नाही.कन्नेवाड कुटूंबीयांनी सुनेला व मुलाला आनंदाने परतणीसाठी माहेरी पाठविले आणि पामलवार कुटूंबातील भावंडे आपल्या लाडक्या बहिणीस घरी नेत असतांना अर्ध्या रस्त्यातच हा भीषण अपघात झाला.नववधू पुजा व तिच्या भावंडांचा यात मृत्यू झाल्याने पालमवार कुटूंबीयांची कदापिही भरुन न निघणारी हाणी झाली.तर कन्नेवाड परिवारात ती पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही.एकच क्षणाची चुक झाली त्या वाहन चालकांची व माहेर आणि सासर या दोन्हीकडील परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हे सारे शोकसागरात बुडाले आहेत.

Previous articleशिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवव्याख्यानाचे आयोजन.
Next articleकंटेनर उलटल्याने वाहतुक विस्कळीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here