• Home
  • 🛑 आयफोन १२ लाँचिंगनंतर iPhone 11 च्या किंमतीत १३ हजारांहून जास्त कपात 🛑

🛑 आयफोन १२ लाँचिंगनंतर iPhone 11 च्या किंमतीत १३ हजारांहून जास्त कपात 🛑

🛑 आयफोन १२ लाँचिंगनंतर iPhone 11 च्या किंमतीत १३ हजारांहून जास्त कपात 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 15 ऑक्टोबर : ⭕ अॅपलने तीन जबरदस्त स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. स्मार्टफोन iPhone 11, iPhone SE 2020, आणि iPhone XR च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने हा निर्णय आयफोन १२ सीरीज लाँच करण्यात आल्यानंतर घेतला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत १३ हजार ४०० रुपयांपर्यंत कपात केली आहे. सर्वात मोठी कपात आयफोन ११ च्या फोनमध्ये करण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा, ६.१ इंचाचा डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स दिले आहेत.

१३ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आयफोन ११ च्या ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ५४ हजार ९०० रुपये झाली आहे. स्मार्टफोनला ६८ हजार ३०० रुपयांत लाँच केले होते. याचप्रमाणे आयफोन ११ चा १२८ जीबी मॉडलची किंमत ५९ हजार ९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६९ हजार ९०० रुपये झाली आहे. नवीन किंमती कंपनीने आपल्या वेबसाईटवर अपडेट केल्या आहेत.

नवीन iPhone SE आणि XR च्या किंमतीत २६०० रुपये आणि ४६०० रुपये कमी केले आहेत. आयफोन एसईच्या ६४ जीबी मॉडलची किंमत ३९ हजार ९०० रुपये, १२८ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ४४ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी मॉडलची किमत ५४ हजार ९०० रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे एक्सआरच्या ६४ जीबी मॉडलची किंमत ४७ हजार ९०० रुपये आणि १२८ जीबी मॉडलची किंमत ५२ हजार ९०० रुपये झाली आहे.

अॅपलने घोषणा केली आहे की, अॅपल ई-स्टोर वरून आयफोन ११ खरेदी केल्यानंतर एयरपॉड्स फ्रीमध्ये मिळणार आहे. सर्वात कमी किंमतीच्या एयरपॉड्सची किंमत सुद्धा १४ हजार ९०० रुपये आहे. आयफोनची किंमत ४० हजार रुपये होते. जर तुम्हाला एअरपॉड्स घ्यायचा नसेल तर अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून फोन खरेदी करता येवू शकतो. या ठिकाणी ६४ जीबी मॉडलची किंमत ५० हजारांपेक्षा कमी आहे.⭕

anews Banner

Leave A Comment