• Home
  • 🛑 JEE च्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा चुकली असेल तर पुढच्या वर्षी पुन्हा संधी 🛑

🛑 JEE च्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा चुकली असेल तर पुढच्या वर्षी पुन्हा संधी 🛑

🛑 JEE च्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा चुकली असेल तर पुढच्या वर्षी पुन्हा संधी 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 15 ऑक्टोबर : ⭕ Coronavirus च्या संकटात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेल्या नाहीत. भारतातील इंजिनिअरिंगची महत्त्वाची परीक्षा JEE Advanced नुकतीच पार पडली. पण कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. आता या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनाच्या कारणामुळे परीक्षेला जाता न आलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुढील वर्षी (2021) देता येणार आहे. त्यासाठी कोणताही नवा अर्ज करावा लागणार नाही.

JEE Advanced ही परीक्षा देशभरातील इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येते. तर JEE Main ही परीक्षा भारतातील 23 IITs मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येते. या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी कोणताही नवीन अर्ज करावा लागणार नाही. परंतु यासाठी विशिष्ट वयोमर्यादा असण्याचा अंदाज देखील  आयआयटी दिल्लीचे डायरेक्टर वेणुगोपाल राव यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, 2020 मध्ये  ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. परंतु कोरोनामुळे परीक्षेस बसता आलं नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी या परीक्षेस बसता येणार आहे. या वर्षी अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये जवळपास 43 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण झाले असून, यामध्ये 6,707 मुलींचा देखील समावेश आहे. 27 सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. कोरोनाच्या संकटात परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि काळजी घेण्यात आली होती.

दरम्यान, JEE Advanced परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला JEE Main पास होणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला दोन वेळा बसण्याची संधी दिली जाते. त्यामुळे या वर्षी ज्यांची दुसरी संधी होती त्यांना मोठा दिलासा मिळाला असून ते पुढील वर्षी देखील परीक्षेस बसू शकणार आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment