Home नाशिक पिंगळवाडे येथील वन विभागात वृक्षारोपणास सुरुवात

पिंगळवाडे येथील वन विभागात वृक्षारोपणास सुरुवात

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0035.jpg

पिंगळवाडे येथील वन विभागात वृक्षारोपणास सुरुवात
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
वनपरिक्षेत्र ताहाराबाद यांच्या आदेशान्वये पिंगळवाडे येथे वृक्षारोपणास सुरुवात.
मालेगाव उपविभागीय अधिकारी जे.एन.एदलवार यांच्या आदेशान्वये व वनपरिक्षेत्र अधिकारी जोगदंड मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली पिंगळवाडे येथे जंगल संपत्तीत वाढ व्हावी व पर्यावरणाचा समतोल असावा या साठी पिंगळवाडे येथे साधारण २५ हेक्टर क्षेत्रावर विविध रोपांची लागवड होत आहे. त्यात करंज ,खैर, बोर,शिसव, शिवण, कांचन, आवळा, चिंच,आदी जंगली झाडे लावण्यात येत आहेत.तसेच या डोंगरावर ठिकठिकाणी पाणी अडवण्यासाठी मोठ्या मोठ्या चाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. व पाळीव प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी जंगल सीमा रेषा चारी सुद्धा करण्यात आली आहे. भविष्यात पाळीव प्राण्यांचा या जंगल संपत्ती त्रास होऊ नये यासाठी वन विभाग सदैव तत्पर आहे संबंधित अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात ताहाराबाद परिक्षेत्रात जवळ जवळ सर्वच डोंगरांवर जंगल संपत्तीत वाढ करण्यात येईल. या वृक्षारोपणाच्या कामी वनपरिक्षेत्र अधिकारी जोगदंड वन परिमंडळ अधिकारी पी आर परदेशी, विनायक देवरे, वनरक्षक संकेत मुंडे, वन कर्मचारी रवींद्र गांगुर्डे, भाऊसाहेब शिंदे, देविदास कामडी, चौरे आदी उपस्थित होते

Previous articleपिंगळवाडे प्राथमिक उपकेंद्राची दुर्दशा.
Next articleगौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here